Vinay Kore: 'कोंबडं झाकलं म्हणजे...'; नरकेंचा विजय सोपा केलेल्या विनय कोरेंच्या कट्टर समर्थकाची भाजपमध्ये 'एन्ट्री'
Kolhapur News : करवीर विधानसभा निवडणुकीत महायुतीत बंडखोरी झाली. त्याचा फायदा शिवसेनेची उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांना झाला. मात्र सातत्याने काँग्रेसकडून राज्याचे उमेदवार संताजी घोरपडे हे महायुतीचा घटक असल्याचा आरोप करण्यात आला. भाजपचा 'बी पार्ट' निवडणुकीच्या रिंगणात उतरले, अशी टीका घोरपडे यांच्यावर सातत्याने काँग्रेसकडून करण्यात आली.
अखेर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर संताजी घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे आमदार विनय कोरे यांना हा धक्का समजला जातो.
विधानसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके, काँग्रेसकडून दिवंगत आमदार पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील तर जनसुराज्य शक्तीने बंडखोरी करत संताजी घोरपडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. संताजी घोरपडे यांच्या बंडखोरीचा फायदा आमदार चंद्रदीप नरके यांना झाला.
अवघ्या थोडक्यात मतांनी चंद्रदीप नरके विजय झाले. राहुल पाटील यांच्या मागे सहानुभूती असताना देखील नरके यांचा विजय झाल्याने आश्चर्य मानले जात होते. मात्र कालांतराने घोरपडे यांनी केलेली बंडखोरी ही नरके यांच्या पथ्यावर पडली. हेच विजयाचं प्रमुख कारण समोर आले.
संताजी घोरपडे हे सातत्याने गो माता बचाव आंदोलनात सक्रिय होते. त्यातच त्यांची भाजपच्या नेत्यांची जवळीकता वाढली होती. घोरपडे हे भाजपचेच (BJP) असल्याची टीका निवडणुकीत देखील विरोधकांनी केली होती. त्यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. अखेर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करत सत्य उजेडत आणल्याची चर्चा विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे.
दरम्यान, घोरपडे यांच्या भाजप पक्षप्रवेशाने करवीर विधानसभा मतदारसंघात भाजपला प्रमुख चेहरा मिळालेला आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसची ताकद बळकट आहे. विधानसभा निवडणुकीत संताजी घोरपडे यांनी गाव पातळीवर प्रचार करत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्याचा फायदा भाजपला कमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल असा देखील अंदाज बांधला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.