Udayanraje Bhosale Rajya Sabha Seat: 'राज्यसभेतील उदयनराजेंच्या रिक्त जागेवर साताऱ्यातीलच पदाधिकाऱ्याला संधी द्या' ; सातारा भाजपाची मागणी!

Shivendra Singh Raje Bhosale : शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाच्या मंत्रिपदाची जबाबदारी मिळावी, अशीही मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Shivendra Raje Bhosale Udayanraje Bhosale
Shivendra Raje Bhosale Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Satara BJP News : सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांन घेतलेल्या परिश्रमामुळे खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांनी मागणी केलेल्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोचविणार असल्याचा शब्द सातारा लोकसभेचे प्रदेश प्रभारी योगेश टिळेकर यांनी दिला.

दरम्यान,उदयनराजे भोसले हे लोकसभेचे खासदार झाल्यामुळे त्यांच्या राज्यसभेची रिक्त झालेल्या जागेवर सातारा लोकसभेतीलच पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असा महत्वपूर्ण ठराव भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने केला आहे.

सातारा लोकसभेचे प्रदेश प्रभारी माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा भाजपची सातारा लोकसभेची आढावा बैठक नुकतीच झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी योगेश टिळेकर यांचे स्वागत केले. तसेच लेाकसभेच्या निवडणुकीत केलेल्या कामगिरीची माहिती कदम यांनी दिली.

यावेळी बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयाबद्दल त्यांच्याही अभिनंदनचा ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला.

Shivendra Raje Bhosale Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे मानणार मतदारांचे आभार ; कोरेगाव, पाटण, कराडमध्ये मेळाव्यांचे आयोजन!

तसेच सातारा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांना केंद्रात चांगले मंत्रिपद मिळावे तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसभेला ज्याप्रमाणे झोकून देऊन काम केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाच्या मंत्रिपदाची जबाबदारी मिळावी, असा ठराव मांडून मंजूर करण्यात आला.

यानंतर सर्वात महत्वपूर्ण ठराव करण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार होते. ते आता लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर सातारा लोकसभेतीलच भाजपचा पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांला संधी मिळावी, असा महत्वपूर्ण ठराव बैठकीत मांडून तो सर्वानुमते मंजूरही करण्यात आला आहे.

Shivendra Raje Bhosale Udayanraje Bhosale
Udayanraje & Pankaja Munde : पंकजाताईंना दिलेला शब्द उदयनराजे पाळणार; राजीनामा देणार का?

योगेश टिळेकर यांनी सातारा लोकसभेतील सहा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. सातारा लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे त्यांचा अहवाल करुन तो प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांच्याकडे आणि प्रदेश कोअर कमिटीकडे सुपूर्द करणार असल्याचे टिळेकर यांनी सांगितले.

यावेळी भाजप(BJP) प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, कोरेगावच्या प्रिया शिंदे, अविनाश कदम, धनंजय पाटील, भरत मुळे, पाटणचे नेते विक्रमबाबा पाटणकर ,तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com