Satara DCC Bank : सातारा जिल्‍हा बँकेसाठी पडद्याआड घडामोडींना वेग : शंभुराज देसाईंनी पुन्हा धूळ चारण्यासाठी पाटणकरांकडून मोठा डाव

Satara DCC Bank : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पाटणमध्ये शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात संघर्षाची तयारी सुरू आहे
Satyajeet Patankar-Shambhuraj Desai
Satyajeet Patankar-Shambhuraj DesaiSarakarnama
Published on: 
Updated on: 

Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या निवडणुकीसाठी पाटणमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. देसाई-पाटणकरांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून, ठराव झालेले मतदार अज्ञात स्थळी पाठवल्‍याची माहिती आहे, तर प्रत्येक मतदारावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, पडद्याआडच्या घडामोडींना सध्या वेग आला आहे.

पाटण तालुक्यात सोसायटी मतदारसंघाचे मतदान १०५ आहे. मात्र, एका सोसायटीचा ठराव प्राप्त न झाल्याने १०४ मतदान अंतिम करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी एक ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे, तर एक नोव्हेंबरला जिल्हा बँकेसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठराव घेण्याच्या प्रक्रियेपासून राजकारण रंगू लागले आहे.

सोसायट्यांचे संचालक फोडण्यापासून ते पोलिस बंदोबस्तात ठराव घेण्यापर्यंत वातावरण तापले होते. काही संचालकांना ठरावाच्या सभेपर्यंत अज्ञात स्थळी ठेवले होते. भारसाखळे येथील एका गटाचे संचालक सभेला उपस्थित न राहिल्याने कोरम पूर्ण न होऊ शकल्याने ठराव कोणाच्याच बाजूने झाला नाही.

Satyajeet Patankar-Shambhuraj Desai
Satara Politic's : उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिवेंद्रराजेंचं भाष्य : म्हणाले, माझ्याशी कोणतीही चर्चा...

जिल्हा बँकेवर संचालक म्हणून भाजपाकडून सत्यजित पाटणकर पुन्हा इच्छुक आहेत, तर मंत्री शंभूराज देसाई मागील निवडणुकीत १४ मतांनी झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याच्या प्रयत्नात आहेत. पाटणकर गटाकडून ठराव झालेले मतदार अज्ञातस्थळी पाठवल्याची चर्चा आहे, तर मंत्री शंभूराज देसाई गटाची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष निवडणुकीत जिल्हा परिषदेप्रमाणे कोणताही दगाफटका होता कामा नये, याची खबरदारी घेतली जात आहे.

Satyajeet Patankar-Shambhuraj Desai
Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेत मोठा गेम? विशाल पाटलांची भाजपला साथ, संजयकाका पाटलांच्या मॅच फिक्सिंग आरोपांमुळे खळबळ

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महायुतीमधील तीन पक्षांमध्येच जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असूनही भाजपने फोडाफोड करत झेडपीची सत्ता काबीज केली होती. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत स्थानिक नेत्यांनी अजूनही मौन पाळले आहे. स्थानिक नेत्यांनी तर त्याबाबत भाष्य करणेही टाळले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com