Satara Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत तोतया निरीक्षकाचा प्रवेश; दहिवडीत पुणेकर महिलेला अटक

Police FIR : रविवारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यावेळी एका तोतया निवडणूक निरीक्षक बनून आलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
Akshada Deshpande
Akshada Deshpandesarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दहिवडी येथील मतदान केंद्रावर तोतया निवडणूक निरीक्षक बनून आलेल्या वैशाली अक्षदा देशपांडे (रा. पाषाण-सुस रोड, पुणे) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

२०२३ मधील निवडणूक आयोगाचे जुने ओळखपत्र गळ्यात अडकवून ती केंद्रावर वावरत असताना, संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिचे बिंग फुटले.

सद्यस्थितीत या नावाच्या कोणत्याही निरीक्षकाची नियुक्ती नसल्याचे स्पष्ट होताच, पोलीस हवालदार अजय झुंजार यांच्या फिर्यादीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २०४ आणि २०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. १२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Akshada Deshpande
Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट : भाजप आमदार अतुल भोसलेंचा रामराजे नाईक निंबाळकरांच्या मतदारसंघातून अर्ज

२१ जागांपैकी ९ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १२ जागांसाठी आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ११५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराजे देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि त्यांचे बंधू शेखर गोरे, रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर विरुद्ध माजी खासदार निंबाळकर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर या लढतींकडे राज्याचे लक्ष लागून राहिला आहे.

Akshada Deshpande
Satara District Bank Election: मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का; सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधीच बड्या नेत्याने हाती घेतला 'धनुष्यबाण'; भाजप 'चाल' बदलणार..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.