Tushar Doshi : शंभूराज देसाईंची 'ती' शक्यता फोल : सातारचे SP तुषार दोशी पुन्हा कामावर हजर; रजा नेमकी कोणती?

Satara Zilla Parishad President Election 2026 : सातारा एसपी तुषार दोशी नऊ दिवसांच्या रजेनंतर कामावर रुजू झाल्याने सक्तीच्या रजेच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून झेडपी वादातील तर्क-वितर्क थांबले आहेत.
Tushar Doshi
Tushar DoshiSarkarnama
Published on
Updated on

Satara, 07 April : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या वादग्रस्त निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक नऊ दिवसांच्या अर्जित रजेनंतर आज (ता. 07 एप्रिल) कामावर हजर झाले आहेत, त्यामुळे दोशी यांच्या सक्तीच्या रजेच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, त्यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी चौकशीमुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले असण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, ती शक्यता फोल ठरली आहे.

सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad)अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदानाला आले असताना सभागृहाच्या बाहेर अटक केली हेाती. त्या वेळी झालेल्या राड्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते.

मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना झालेली धक्काबुक्की याप्रकरणी विधान परिषद आणि विधानसभेत आवाज उठविण्यात आला होता. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्याचे सांगून अधीक्षक दोशींसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यावेळी सभागृहात देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली गेली होती.

विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे निर्देश सरकारला दिले होते. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.

Tushar Doshi
Tanaji Sawant : तानाजी सावंतांनी अखेर संधी साधलीच : दुरावलेला पुतण्या अन्‌ भगीरथ भालके 12 एप्रिलला शिवसेनेत प्रवेश करणार

हा वाद सुरू असतानाच अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी निर्णायक भूमिका बजावणारे जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी रजेवर गेले होते. त्यावेळी ही सक्तीची रजा आहे, की अर्जित रजा यावर चर्चा रंगली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यात यावरून कलगीतुराही रंगला होता.

Tushar Doshi
Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंनी परिचारकांना डिवचले; विधानसभेत लढूनच जाईन; पाठीमागच्या दाराने जाणारा मी नाही...

दरम्यान, अर्जित रजेवर गेलेले अधीक्षक तुषार दोशी यांनी आज कार्यालयात हजर होऊन पदभार स्वीकारला. त्यामुळे सक्तीच्या रजेच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पालकमंत्र्यांच्या समर्थकांचा त्यामुळे अपेक्षाभंग झाल्‍याची चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com