

Mumbai Municipal Election : मुंबई अन् आसपासच्या महापालिकांसह ठाकरे बंधूंनी युती निश्चित झाली आहे. जागा वाटप देखील अंतिम टप्प्यात आलं आहे. यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस बाजूला पडली असून स्वबळाचा नारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने मात्र पांरपरिक काँग्रेस या मित्रपक्षाऐवजी ठाकरे बंधूंना झुकतं माप देताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेत ठाकरेंबरोबर आघाडी करताना, पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45जागांवर दावा केला.
मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेसोबत, ठाकरे बंधूंबरोबर युती करण्याबाबत अनुकूलता दाखविली. 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जागा जिंकल्या होत्या. यावेळी होत असलेल्या पालिका निवडणुकीसाठी पक्षाने विविध प्रभागांमध्ये चांगली बांधणी केली असून, पक्षालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती ‘राष्ट्रवादी’च्या मुंबईच्या अध्यक्ष राखी जाधव यांनी दिली.
आघाडीबाबत राखी जाधव म्हणाल्या, की आमच्या पक्षाने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेसोबत बोलणी सुरू आहे. लवकरच याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी 25 ते 30 प्रभाग पिंजून काढले आहेत. त्या जागा जिंकू, असा विश्वास अध्यक्ष राखी जाधव यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने राज ठाकरे मनसेशी जवळपास युती निश्चित केल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेसने शिवसेना ठाकरे पक्षाला दूर लोटत, मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि प्रभारी रमेश चेन्निथला यांनी यावर भूमिका मांडली. 'लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार,' असे रमेश चेन्निथला यांनी सांगितले.
मुंबई काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत प्रभारी रमेश चेन्निथला, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आणि सहप्रभारी यू. बी. व्यंकटेश, खासदार चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, आमदार अस्लम शेख, अमिन पटेल आदी उपस्थित होते.
चेन्निथला म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील चार वर्षांपासून झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने ही निवडणूक होत आहेत. निवडणूक व्हावी, अशी राज्य सरकारची इच्छाच नव्हती. कारण सरकार थेट महापालिकेचा कारभार पाहत होते. पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी केली आहे." भाजप नेतृत्वाखालील महायुती जनतेच्या प्रश्नावर लक्ष न देता हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचे चेन्निथला यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवर, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. या निर्णयामुळे पक्षाचेच नुकसान होईल. मुंबईकरांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.