Satara NCP News : माणच्या 'जयकांत'ला धडा शिकवण्यासाठी आमच्याकडे 'सिंघम'...

Mahebub Shaikh : युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांची जयकुमार गोरेंवर टीका. माण - खटाव विधानसभा मतदारसंघात विजय निश्चय मेळावा संपन्न.
Maan
MaanSarkarnama
Published on
Updated on

Maan - Khatav Assembly : सातारा जिल्ह्यात शरद पवार राष्ट्रवादी गटाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे सुरु केले आहेत. विजय निश्चय मेळाव्यातून लोकांपर्यंत पोहचण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी लोकसभेसह विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले आहेत.

आज जिल्ह्यातील माण - खटाव मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय निश्चय मेळावा पार पडला. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी ते म्हणाले, माणचे लोकप्रतिनिधी जयकुमार यांच्या अंगात आता जयकांत शिक्रे शिरलाय. पण त्या जयकांतला धडा शिकवण्यासाठी आपले प्रभाकर देशमुख आता 'सिंघम' बनले आहेत.

Maan
Sharad Pawar : शरद पवारांचा शिलेदारच म्हणाला 'ही' तर अफवा...

येणाऱ्या काळात ते दाखवून देतील. या जयकांतसारखा भेकाड माणूस दुसरा कोणच नाही. कारण जो मुख्यमंत्री होईल त्याचा दरवाजा उघडायला हा नेहमीच पुढे असतो. कारण ते सत्तेशिवाय तो राहूच शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 2014 च्या अगोदर कोणाला ईडीची माहित नव्हती पण आता ईडी सर्वाना कळाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात 'रंगा अन् बिल्ला' भाई आणि राज्यात 'टरबुज्या अन् पिस्तुल' भाई आलेत. ते सत्तेसाठी काहीही करत आहेत. आपल्याकडून गेलेल्यांचा एकचा नारा आहे. तुरूंगापेक्षा भाजप बरा, अशी त्यांची गत झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रभाकर देशमुख तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited by Amol Sutar)

Maan
Rahul Gandhi News : भाजपनं पराचा कावळा केला! श्वानाच्या व्हायरल व्हिडिओवर राहुल गांधी भडकले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com