Satara ZP : साताऱ्यात शंभुराज देसाईंच विमान जमिनीवर : महायुती फिक्स करत जयकुमार गोरेंनी अध्यक्षपद भाजपकडे खेचून आणलंच!

Satara ZP : साताऱ्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या स्वतंत्र सत्तेच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीने महायुती एकत्र येणार आहे. यात अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहण्याची शक्यता आहे.
BJP, Shiv Sena, and NCP finalize Satara Zilla Parishad power-sharing deal
BJP, Shiv Sena, and NCP finalize Satara Zilla Parishad power-sharing dealSarkarnama
Published on
Updated on

Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपला बाजूला ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर भाजपसह महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र सत्ता स्थापन करणार आहेत. या सत्ता वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची माहिती आहे. यात सर्वात महत्त्वाचे असलेले अध्यक्षपद भाजपकडेच राहणार असल्याचे सांगितले जाते.

65 जागांच्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपला 27 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपविरोधात एकत्र लढून राष्ट्रवादीने 20 आणि शिवसेनेने 15 जागांवर विजय मिळवला. संपूर्ण निवडणूक काळात भाजपने विशेषतः मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या विधानांमुळे मित्रपक्षांची मने दुखावली होती. त्यामुळे निकालानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापन करायच्या हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र भाजपकडून या हालचालींना वरिष्ठ पातळीवरून खो घालण्यात आला.

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. याशिवाय सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना "निवडणूक काळात टीका होतच असते" असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महायुतीच्याच बाजूने मत व्यक्त केले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात भाजपच्याच नेतृत्वात सत्ता स्थापन करण्यावर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असल्याची माहिती आहे. यात सत्ता वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे.

BJP, Shiv Sena, and NCP finalize Satara Zilla Parishad power-sharing deal
Shambhuraj VS Gore : जयकुमार गोरे मोठे अन्‌ दिग्गज मंत्री, त्यांच्यावर बोलताना भीती वाटते : शंभूराज देसाईंचा खोचक टोला

सत्ता वाटपाचा फॉर्म्युला :

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडेच राहणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद दिले जाणार आहे. याशिवाय बांधकाम आणि आरोग्य समित्यांचे सभापतीपदही उपाध्यक्षांकडेच राहणार आहे. उरलेल्या इतर समित्यांच्या सभापतीपदांमध्ये शिवसेनेला झुकते माप मिळणार आहे. या निमित्ताने मंत्री गोरे पुन्हा एकदा पालकमंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यावर भारी पडल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com