Satara ZP : साताऱ्यात भाजपचं गर्वहरण! सत्तेसाठी शिवेंद्रराजे, जयकुमार गोरेंना शंभूराज देसाईंच्या बंगल्याच्या पायऱ्या चढाव्याच लागणार!

Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थितीमुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका कळीची ठरली आहे. 'कोयना दौलत'वर रंगणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बैठकींमधूनच जिल्ह्याच्या सत्तेचा आणि अध्यक्षपदाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.
Guardian Minister Shambhuraj Desai’s official residence, 'Koyna Daulat' in Satara, which has become the epicenter of political discussions for forming a majority and selecting the Zilla Parishad President.
Guardian Minister Shambhuraj Desai’s official residence, 'Koyna Daulat' in Satara, which has become the epicenter of political discussions for forming a majority and selecting the Zilla Parishad President.Sarkarnama
Published on
Updated on

Satara ZP : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री कोणीही असूदे असे म्हणत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना अनेकदा डिवचले. परंतु, जिल्ह्यातील मतदारांनी दिलेले कौल पाहता जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी शंभूराज देसाई यांचीच भूमिका महत्वाची बनली आहे. निवडणुकीदरम्यान त्यांच्या कोयना दौलत निवासस्थानात राष्ट्रवादी व शिवसेनेची बैठक लक्षवेधी ठरली होती. आता अध्यक्षपदाच्या निवडीतही कोयना दौलतवरील रणनितीच निर्णायक ठरणार आहे.

जिल्हा परिषदेचे एकुण ६५ गट आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ३३ जागांची गरज आहे. भाजपला केवळ २७ जागांवर विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे २०, शिवसेनेचे १५, काँग्रेसचा एक, स्वाभिमानी पक्षाचा १ असे ३७ चे संख्याबळ होते. बहुमतासाठी भाजपला अजून ६ सदस्यांची गरज आहे. थोडक्यात भाजपला स्वबळावर जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यापासून रोखण्यात राष्ट्रवादी व शिवसेनेला यश आले आहे.

स्वबळाबवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपने निवडणुकीच्या सुरवातीपासून महायुतीमधील घटक पक्षांना डावलण्याचे काम केले. किंबहूना या पक्षांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेतली. शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या महायुतीच्या बैठकीला भाजपचा वरिष्ठ नेत्यांनी पाठ दाखविली होती. त्याला प्रत्यत्तर म्हणून मंत्री देसाई यांनी त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदत आणि पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची महत्वपूर्ण बैठक केली. यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मतदार संघनिहाय लढती ठरविण्यात आल्या. त्याचे पडसाद जिल्हा परिषद निवडणुक निकालामध्ये उमटले आहेत.

Guardian Minister Shambhuraj Desai’s official residence, 'Koyna Daulat' in Satara, which has become the epicenter of political discussions for forming a majority and selecting the Zilla Parishad President.
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषदेत मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना मोठा धक्का, शिवसेनेच्या महिला उमेदवार ठरल्या 'जायंट किलर'

भाजपमधून निलंबीत केलेले रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. पक्षीय चिन्हावर निवडून आले असले तरी, शिवसेनेचे कोरेगावमधील २ सदस्य भाजपशी जवळीक असणाऱ्या महेश शिंदे यांना मानणारे आहे. तसेच फलटणमधील राष्ट्रवादीचा एक सदस्य भाजपसोबत युतीकरून निवडणुकीला सामोरे गेलेला आहे. यांनी भाजपला मदत करायची ठरवली आणि वेताळांनी पक्षाला साथ दिली तरीही चारच सदस्यांची गोळाबेरीज होत आहे.

Guardian Minister Shambhuraj Desai’s official residence, 'Koyna Daulat' in Satara, which has become the epicenter of political discussions for forming a majority and selecting the Zilla Parishad President.
Satara ZP Result : छत्रपती उदयनराजेंसह शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंना धक्का; साताऱ्यात ‘भाजप’चे विमान 'राष्ट्रवादीकडून' जमिनीवर

त्यात पक्षीय व्हिपची अडचण आहे ती वेगळीच. त्यामुळे शिवसेनेच्या पाठींब्याशिवाय भाजप सत्तेत जाऊ शकत नाही. त्याची सूत्रे मंत्री देसाई यांच्या हातात आहेत. दुसरीकडे मंत्री पाटील आधीपासूनच मंत्री देसाईंशी संधान बांधून आहेत. त्याला सध्या शिवसेनेत असलेले माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची साथ असणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील सत्तेची वाट कोयना दौलतवरील वाटाघाटी व रणनितीवर अवलंबून राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com