Kolhapur Politics: सतेज पाटलांना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Satej Patil News : उचगावमधील अनेकांनी सतेज पाटलांना रामराम ठोकत भाजपत प्रवेश केला.
Kolhapur BJP
Kolhapur BJPSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या उचगावमध्ये सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. विजय गुळवे, विनायक जाधव, मच्छिंद्र सुतार आणि संभाजी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह सतेज पाटील गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

नागाळा पार्क येथील भाजप (BJP) कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत या चौघांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी राजकीय गट तट विचारात न घेता नेहमीच विकासाला साथ दिली आहे, म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे या वेळी विजय गुळवे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kolhapur BJP
Pune Political News : रामराजेंच्या प्रयत्नांना यश; राजमाता सईबाई स्मृतीस्थळाच्या विकास आराखड्यास मान्यता

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास केवळ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे अधिकाधिक कार्यकर्ते आमच्या सोबत येत आहेत, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

सुडाचे राजकारण न करता सर्वसामान्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा भारतीय जनता पक्षाचा विचार लोकांना पटत आहे, अशा भावना धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल्या, तर माजी आमदार अमल महाडिक (amal mahadik) यांनी सर्वांना न्याय देण्याची आमची भूमिका असल्यामुळे लोकांची साथ लाभत आहे, भविष्यात इतर गावांमधून अन्य काही प्रवेशही पार पडणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

या वेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, अनिल पंढरे, किरण घाटगे, अनिल शिंदे, एन डी वाईंगडे, राजू संकपाळ, उमेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उचगावसारख्या मोठ्या गावातील कार्यकर्त्यांनी सतेज पाटील गटातून भाजपमध्ये केलेला प्रवेश नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Kolhapur BJP
Satara News : कराड दक्षिणमधील हजारो शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' प्रकल्पाला उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ग्रीन सिग्नल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com