Satej Patil: राहुल गांधी स्टाईल सतेज पाटलांची पत्रकार परिषद; महायुतीला झोडपून काढत विचारला जाब

Satej Patil: कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावरून घेरण्यात येत आहे.
Satej Patil: राहुल गांधी स्टाईल सतेज पाटलांची पत्रकार परिषद; महायुतीला झोडपून काढत विचारला जाब
Satej Patil Kolhapur news
Published on
Updated on

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावरून घेरण्यात येत आहे. आपल्यावर होत असलेल्या आरोपांना आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या स्टाईलप्रमाणं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी 'थेट पाईपलाईन'ची वस्तुस्थिती मांडली.

Satej Patil: राहुल गांधी स्टाईल सतेज पाटलांची पत्रकार परिषद; महायुतीला झोडपून काढत विचारला जाब
उमर खालीद, शरजील इमाम यांना सुप्रीम कोर्टानं का नाकारला जामीन? 'ही' आहेत कारणं

निवडणूक आली की थेट पाईपलाईनचा मुद्दा काढला जातो. निवडणूक संपली की थेट पाईपलाईनचा मुद्दा देखील बाजूला पडतो. मात्र, कोल्हापूरच्या जनतेला याची सत्य समजावे यासाठी पुन्हा उजळणी करतोय. थेट पाईपलाईन मंजूर झाल्यानंतर 55 बैठका झाल्या आहेत. खूप अडचणीतून ही योजना पूर्ण केली आहे. 2014 नंतर राज्यातील सत्ता बदलली. मात्र, आम्ही आधीच 170 कोटीचा चेक काढला होता. कारण सगळ्या कामांना सरकारने स्थगिती दिली होती. 2014 पासून सरकार भाजपचं होतं त्यांनी चेक काढले आहेत. जर योजना चुकीची होती तर केंद्र सरकारने निधी कसा दिला? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला.

Satej Patil: राहुल गांधी स्टाईल सतेज पाटलांची पत्रकार परिषद; महायुतीला झोडपून काढत विचारला जाब
Kolhapur News: कोल्हापुरात कोणी काय लुबाडलं? इतके वर्षे नेत्यांनी दडपून ठेवलेली कुंडली आत्ताच का निघते?

जर योजनेत चूक असेल तर केंद्र सरकार निधी देत नाही. पण केंद्र सरकारने दुसरा आणि तिसरा टप्प्यात निधी दिला. 2045 पर्यंत लोकसंख्येचा विचार करून योजना केली. थेट पाईपलाईनने आम्ही पुईखडीपर्यंत पाणी आणलं. पण वितरण करण्याची जबाबदारी पालिकेची होती. अमृत योजनेचा खेळ सांगलीचे आमदार सुरेश खाडे यांच्या मुलाकडे आहे. कामात दिरंगाई केल्याने पालिकेने त्या ठेकेदाराला 25 कोटींचा दंड लावला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी हा दंड तेवढा वसूल करण्यास मदत करावी. भाजप नेते आमदार सुरेश खाडे यांच्या मुलाची चौकशी करणार का? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला.

थेट पाईपलाईनचे योजनेचे श्रेय मला मिळू नये यासाठी राजकारण करण्यात आलं. थेट पाईपलाईन योजनेचे नुकसान करणाऱ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. जर या योजनेत भ्रष्टाचार झाला असं चंद्रकांतदादा म्हणतात, पण तुमचे सरकार 8 वर्षे आहे मग याची चौकशी का केली नाही? चंद्रकांतदादा आणि राज्यसभेचे खासदार यांच्या घरात थेट पाईपलाईनचे पाणी दोन वर्षांपासून येतं. थेट पाईपलाईनचे पाणी पिऊनच हे बाहेर पडतात. पण कोल्हापूर शहरात पाणी येत नाही हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले.

थेट पाईपलाईनचे पाणी पुईखडीपर्यंत आणायची जबाबदारी आमची होती. मात्र, वितरण व्यवस्था करण्याचा ठेका सुरेश खाडे यांच्या भावाकडे होता, आता त्यांना झालेला दंड चंद्रकांतदादा वसूल करणार आहेत का? माझ्यावर टीका करा पण कोल्हापूरकरांना वेठीस धरू नका. हे प्रेझेंटेशन आता चंद्रकांतदादा आणि आमदार राजेश क्षीरसागर यांना पाठवणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, 508 दिवस वन विभागाची परवानगी न मिळाल्याने काम थांबलं होतं. पाटबंधारे विभागाने 202 दिवस परवानगी न दिल्याने काम थांबलं, असे अनेक वेळा परवानगी न मिळाल्याने काम थांबलं आहे. 2019 साली आमचं सरकार आल्याने आम्ही सर्व मंजुरी घेतली, अस सतेज पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com