

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जशी जाहीर झाली आहे, तसे रणांगण तापू लागले आहे. महायुती विरुद्ध काँग्रेस अशी लढाई होत असताना आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झडत आहेत. अशातच कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रचाराची पातळी ही व्यक्तिगत स्तरावर पोहोचली आहे. गेल्या मागील वर्षात एकमेकांसोबत सत्तेत असलेल्या नेत्यांनीच आता एकमेकांच्या विरोधात बोट दाखवणे सुरू केले आहे.
राजकारणात सोयीस्कर भूमिका कोण घेते? शिवाय याचा प्रत्यय देणारी आणि प्रत्यक्ष कोण काय लुबाडले? याच बिंग फोडणारी ही निवडणूक ठरणार आहे. त्याचा प्रत्यय नुकताच प्रचाराच्या निमित्ताने येत आहे. सहकारात एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे आणि महायुती म्हणून नेत्यांच्या विरोधात लढणारे या महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.
नुकतेच काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जनसुराज्य शक्तीचे नेते आमदार विनय कोरे यांच्यावर जागा लाटण्याचा आरोप केला. तर थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावरून बोलताना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील पाईपलाईन खरेदीमध्ये 70 कोटींचा ढपला पाडल्याचा आरोप केला. पण वस्तुस्थिती पाहिली तर 2005च्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि जनसुराज्य सत्तेत होती. सध्याच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढत असले तरी एकेकाचे सहकारी म्हणून त्यांची ओळख कोणीही पुसू शकत नाहीत. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि जनसुराज्य शक्तीचे नेते आमदार विनय कोरे हे गोकुळच्या राजकारणात सध्या एकत्र आहेत. मागील विधानपरिषद निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी आमदार विनय कोरे यांनी आमदार अमल महाडिक यांना माघार घेण्यासाठी आमदार विनय कोरे यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरली होती. त्यावेळी आमदार सतेज पाटील यांनी आमदार विनय कोरे यांनी सिंहाचा वाटा उचलला असल्याचे स्पष्ट केले होते.
तर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे 2016च्या महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत होती. याच दरम्यान थेट पाईपलाईनचे योजना कार्यान्वित होते. त्याचवेळी या योजनेवर नियंत्रण का ठेवलं नाही, असा सवाल देखील उपस्थित होत आहे. कोल्हापूर शहराची इतकीच विकासाची काळजी असेल तर प्रत्येकवेळी राजकीय सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या राजकीय पुढार्यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा ज्या त्यावेळी सत्तेत राहून चुकीच्या कामांना विरोध केला असता आज एकमेकांची कुंडली काढण्याची वेळ आली नसती. एकंदरीतच कोल्हापूर वासियांना गृहीत धरूनच राजकीय नेते आपले राजकारण गुड बुक मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
विश्वपंढरीजवळील चार ते पाच एकर मोक्याची जागा आहे. ५०० कोटी रुपयांची ही जागा आमदार विनय कोरे यांना अवघ्या ३० कोटी रुपयांमध्ये दिली आहे. ही जागा वाचवण्यासाठीच जनसुराज्यने महापालिका निवडणुकीत पॅनेल उभे केले आहे, असा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी केला. काँग्रेसची मते खाण्यासाठीच जनसुराज्य उभे आहे, असा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला.
महिलांना रोजगार मिळावा यासाठी आयटी पार्क मधील जागा जनसुराज्यचे आमदार अशोक माने यांच्या संस्थेसाठी घेतली आहे. जनसुराज्याचे चांगले काम न पाहणाऱ्या लोकांनी आता यावर गरळ ओकायला सुरुवात केली आहे. आमदार सतेज पाटील यांच्याकडील जागांची कुंडली बाहेर काढण्याची वेळ आता आली आहे. निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने बिनबुडाचे आरोप त्यांच्याकडून सुरू आहेत, असा पलटवार जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केला. आमदार पाटील यांनी जागेचाच विषय काढला असेल तर येत्या दोन-तीन दिवसात त्यांच्या अनेक जागांची कुंडली बाहेर काढू. हॉटेल, कृषी महामंडळ आणि वॉटर पार्कची जागा त्यांनी कशी लाटली याची कुंडली माझ्याकडे आहे, असे कोरे यांनी म्हटले असल्याचे एका दैनिकातून स्पष्ट केले.
थेट पाईपलाइन मध्ये विधानसभेच्या पायरीवर मी आंदोलन केले. मी आंदोलन केले म्हणून मंजूर झाली. पण त्याचे श्रेय तुम्ही घेतलं. पाईपलाइन खरेदीमध्ये ७० कोटीचा ढपला पाडला. तुमच्या आमदारांकडून तुमच्यावरच आरोप होतोय. तुम्ही कोल्हापूरसाठी काय केले? याचे उत्तर द्यावे, असा सवालही आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.