Satyajeet Kadam : सत्यजित कदमांची वेगळी चूल? विसर्जन मिरवणुकीत दिसली भाजपमधील दुफळी?

Satyajeet Kadam Kolhapur vidhansabha election Kolhapur : पक्षामध्येही काही अंतर्गत वादामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांपासून दुरावले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
satyajeet kadam
satyajeet kadamSarkarnama
Published on
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र गणेश विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाले. विसर्जनाच्या स्वागत बूथवरून भाजपमधील (BJP) दुफळी अधोरेखित झाली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार आणि मागील पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले सत्यजित कदम यांनी भाजप बूथला लागूनच स्वतंत्र बूथ केल्याने कोल्हापूर उत्तर मधील भाजपमध्ये मतभेद समोर आले आहेत. पक्षामध्येही काही अंतर्गत वादामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांपासून दुरावले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नेत्यांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी कोल्हापुरात (Kolhapur) तुल्यबळ ठरत असताना भाजपमधील नेत्यांनी एकत्रपणे काम केले पाहिजे अशा सक्त सूचना केंद्रीय स्तरासह राज्य पातळीवरून जिल्ह्यातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. अशातच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यावरूनच या मतदारसंघातील भाजपमधील दुफळी ऐन गणेश विसर्जन मिरवणुकीत स्वागत कक्षावरून दिसून आली. मिरवणुकीत गणेश मंडळांशी संपर्क करण्यासाठी स्वागत कक्ष उभारले जातात. येथे मिरवणुकीतील मंडळाच्या अध्यक्षाला नारळ, पान, सुपारी देऊन सन्मानित केले जाते. यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष स्वागत कक्ष उभारतात.

satyajeet kadam
Sharad Pawar : "साहेब, आता तुम्हीच आमचा आधारवड..."; शरद पवारांचा आडम मास्तरांना मोठा शब्द

कोल्हापूर शहरात असणारा गंगावेश येथे भाजपकडून स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. तर त्याच बाजूला भाजपमधील पोटनिवडणुकीतील उमेदवार आणि सध्या आगामी विधानसभा निवडणुकीला इच्छुक असलेले सत्यजित उर्फ नाना कदम (satyajeet kadam) यांनी देखील स्वागत कक्ष उभारलेला पाहायला मिळाला. त्यांनी वेगळा कक्ष उभारल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. कोल्हापूर शहरातील भाजपमध्ये महाडिक गटाची एन्ट्री झाल्यानंतर पक्षांमध्ये जुना आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू आहेत. अशातच कदम यांनी स्वागत कक्ष उभारल्यानंतर अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मतभेद पुढे आल्याने आता नेत्यांना मध्यस्थाची भूमिका बजावी लागणार आहे.

satyajeet kadam
Shivsena Politics : शिवसेना अर्धशतक ठोकणार की शतक?

2014 पासून मी कोल्हापूर शहरासह परिसरातील गणपती विसर्जन करणाऱ्या सार्वजनिक तरुण मंडळाचा सत्कार करत असतो. त्यामुळे मी या ठिकाणी स्वागत कक्ष उभारत असतो. कोरोना काळात मी दोन वर्ष स्वागत कक्ष उभारला नव्हता. यंदा हा स्वागत कक्ष उभारला आहे. त्यामुळे भाजपमध्ये मतभेद आहेत असे काही नाही. आम्ही सर्वच एकत्र आहोत. कोणीतरी ठरवून अशा बातम्या घडवून आणत आहे. अशी प्रतिक्रिया सत्यजित कदम यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली आहे.

satyajeet kadam
Mushrif and Mahadik : महाडिक गट पराभवाचा वचपा काढणार? ; कागलमध्ये महायुतीत खदखद!

मनसेत ही दुफळी

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही या निमित्ताने दुफळी पाहायला मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी राजू जाधव (Raju jadhav) यांनी देखील स्वतंत्र स्वागत कक्ष उभारला होता. तर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी देखील स्वतंत्रपणे स्वागत कक्ष उभारला होता. त्यामुळे मनसेमधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com