Karad News : महाविकास आघाडीचे नेते आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र त्यांचीच विरोधकांना धडकी भरली आहे. दगड फेक हा काही मार्ग नाही. वास्तविक विचारांची लढाई विचाराने लढावी. त्यांनी एक सभा घेतली तर तुम्ही दोन घ्या मात्र दगडफेक करणे निंदनीय आहे, अशी प्रतिकि्या काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी दिली.
श्री. चव्हाण यांच्या हस्ते कराड शहरात विविध कामांचे भूमीपूजन झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपाल कोश्यारी यांच्या बदलीला वेळ झाल्याचा पुनरूच्चार करत आमदार चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, कोश्यारी यांची बदली उशीरा का झाली त्याचे स्पष्टीकरण केंद्राने देणे अपेक्षीत आहे. महाविकास आघाडीने राजीनामाचा आग्रह धरला होता.
महाविकास आघाडीचे नेते आदित्य ठाकरे यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र त्यांचीच विरोधकांना धडकी भरली आहे. दगड फेक हा काही मार्ग नाही. वास्तविक विचारांची लढाई विचाराने लढावी त्यांनी एक सभा घेतली तर तुम्ही दोन घ्या मात्र दगडफेक करणे निंदनीय आहे. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेली दगडफेक निंदनीय आहे.