मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा साधेपणा पाहून मानाचे वारकरी नवले दाम्पत्य भारावले...

Eknath Shinde|Pandharpur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक मानाच्या वारकरी जोडप्याचे पाय धरले.
Eknath Shinde, Lata Shinde in Pandharpur Latest News
Eknath Shinde, Lata Shinde in Pandharpur Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur : आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. यंदा बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. (Eknath Shinde, Lata Shinde in Pandharpur Latest News)

Eknath Shinde, Lata Shinde in Pandharpur Latest News
एकनाथ शिंदे गटाचे पंढरपुरात शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी

पांडुरंगाच्या शासकीय पूजेनंतर बळीराजाचे रूप असलेल्या मानाच्या वारकरी जोडप्याचा सन्मान करण्याची प्रथा आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक पूजा संपन्न झाल्यावर आपला बडेजाव बाजूला ठेवून या मानाच्या वारकरी जोडप्याचे पाय धरले. बळीराजाच्या रुपात भेटलेल्या ह्या विठोबा आणि रखुमाईचे पाय धरून त्यांनी त्यांचे मनापासून आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून नवले दाम्पत्य देखील क्षणभर स्तब्ध झाल होते.

Eknath Shinde, Lata Shinde in Pandharpur Latest News
उद्धवजी,'वर्षा'तून बाहेर पडताना बंडखोर गुवाहाटीत नृत्य करीत पेढे वाटत होते..

यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते या नवले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठू रखुमाईची सुरेख मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. तसेच एसटीच्या वतीने विनामूल्य प्रवासासाठी एक विशेष पासही देण्यात आला. मात्र आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी दाखवलेला हा साधेपणा उपस्थितांची विशेष दाद मिळवून गेला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com