उद्धवजी,'वर्षा'तून बाहेर पडताना बंडखोर गुवाहाटीत नृत्य करीत पेढे वाटत होते..

"ज्यांना उद्धवजींनी भरभरुन दिलं तेच जर दूर जात असतील, तर वर्षा निवासस्थान नको, म्हणून त्यांनी 'वर्षा' सोडण्याचा निर्णय घेतला.
Rebel Shivsena MLA
Rebel Shivsena MLASarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदारांवर शिवसेनेचे नेते, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. राऊत हे सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख, माजी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते, असे राऊतांनी यावेळी सांगितले. (Vinayak Raut news update)

विनायक राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना हातानं खाऊ घातलं. त्यांनी अन्नाची शपथ घेतली, तरीही त्यांनी बेईनामी केली.त्यामुळे उद्धवसाहेबांनी वर्षा सोडण्याचा निर्णय घेतला,"

Rebel Shivsena MLA
मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचा पॅटर्न बदलणार ; शिंदे म्हणाले..

"ज्यांना उद्धवजींनी भरभरुन दिलं तेच जर दूर जात असतील, तर वर्षा निवासस्थान नको, म्हणून त्यांनी 'वर्षा' सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सर्वांना सांगितलं 'चला, बॅगा भरा,' एक-दीड तासातच वर्षांमधील सर्व बॅगा भरुन उद्धवजी वर्षावरुन 'मातोश्री'वर जाण्यास बाहेर पडले. तेव्हा वैभव नाईक यांचे अश्रू अनावर झाले होते. सरकारी अधिकारी, पोलिस रडले. पण त्याच वेळी बेईनामी बंडखोर आमदार गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये नृत्य करीत होते. ते पेढे वाटत होते," असे राऊतांनी सांगितले.

विनायक राऊत यांनी दोन दिवसापूर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. शिंदेंना स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल असा टोला त्यांनी लगावला आहे."मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आज त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे. मी शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं असं आव्हानही विनायक राऊत यांनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com