

Karad, 26 May : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष इंद्रजीत मोहिते यांनी सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. माजी अध्यक्ष मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे भोसले गटाचे पारडं जड झाल्याचं मानलं जात आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील पाच तालुक्यांत ५० हजार २१२ इतके सभासद आहेत. या कारखान्यावर सध्या डॉ. सुरेश भोसले आणि भाजप आमदार डॉ. अतुल भोसले गटाची सत्ता आहे. मात्र, यावेळच्या निवडणुकीतही इंद्रजीत मोहिते यांनी भोसले गटाला पाठिंबा जाहीर केल्याने भोसले गटाची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
इंद्रजीत मोहिते (Indrajeet Mohite) यांनी २००५ ते २०१० या काळात कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या भूमिकेला कृष्णा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वजन आहे. आता इंद्रजीत मोहिते यांनी भाजप आमदार भोसले गटाला पाठिंबा जाहीर केल्याने केडगावचे आमदार विश्वजीत कदम यांच्या निर्णयाकडे कृष्णाच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.
इंद्रजीत मोहिते यांच्या भोसले गटाला पाठिंबा देण्याच्या निर्णयामुळे आता कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आता सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल, तर विरोधात कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते यांचे पॅनेल अशी दुरंगी लढत होणार आहे.
कृष्णा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष इंद्रजीत मोहिते, अविनाश मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर या नेत्यांचे भाजपविरोधात एकत्रित पॅनेल उभे करण्याबाबत चर्चा सुरु होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शांत होते, पण त्यांचाही भाजपविरोधी शक्तींना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा होती. मात्र, हे सर्व अस्तित्वात येण्यापूर्वीच इंद्रजीत मोहिते गटाने सत्ताधारी भोसले गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.
पाठिंब्याचे अतुल भोसले यांनीही केले स्वागत
सहकारात आम्ही कधीही राजकारण करीत नाही, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून या निवडणुकीत जे कोणी आम्हाला पाठिंबा देतील, त्यांचा पाठिंबा आम्ही स्वीकारत आहे. काहींच्या बरोबर आमचा राजकीय संघर्ष असला तरी सहकारात समन्वयाची भूमिका ठेवावी लागते. आम्ही राजकारण व सहकाराची कधीही सांगड घालत नाही. माजी अध्यक्ष इंद्रजीत मोहिते यांनी आम्हाला पाठिंबा द्यायची भूमिका घेतली आहे, त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे भाजप आमदार अतुल भोसले यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.