Pandharpur Politic's : शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेताच भगीरथ भालकेंना दणका : भालकेंशी संबंध नसल्याचे सांगत सात नगरसेवकांचा वेगळा गट

TeerthKshetra Vikas Aghadi News : शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भगीरथ भालकेंना स्वतःच्या गटातील नगरसेवकांनी धक्का देत स्वतंत्र भूमिका घेतल्याने पंढरपूरच्या राजकारणात नवा संघर्ष उभा राहिला आहे.
 bhagirath bhalke
bhagirath bhalkeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 April : तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी येत्या 12 एप्रिल रोजी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्याच दिवशी भालकेंना मोठा धक्का बसला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेऊन आमचा भालकेंशी कोणताही संबंध नाही, ही आघाडी आमची असून व्हीपचा अधिकार इतर कोणालाही नाही, सर्व अधिकार तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अध्यक्षांना द्यावेत, असे पत्र नगररचना विभागालाही दिल्याची माहिती गटनेते नागेश भोसले यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके (Bhagirath Bhalke ), अनिल सावंत, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच दिवशी मंगळवारी तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील सात नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन भालकेंशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

शिवसेनेतील प्रवेशासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी भगीरथ भालकेंनी पंढरपुरातील (Pandharpur) निवासस्थानी बैठक बोलावली होती. त्या बैठकीला नगरसेविका माधुरी धोत्रे, स्मिता फत्तेपूरकर, प्रणिता घाडगे, साधना धोत्रे, रुक्मिणी धोत्रे यांनी दांडी मारली होती.

भगीरथ भालकेंनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, गटनेते नागेश भोसले, नगरसेवक संजय बंदपट्टे, प्रसाद कळसे, अक्षय गंगेकर, किरण घाडगे, सुधीर धोत्रे, धनंजय धोत्रे हे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले होते. या मुळे पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे.

 bhagirath bhalke
Gopichand Padalkar : भाजपकडून गोपीचंद पडळकरांवर आणखी एक जबाबदारी; संघटनात्मक मार्चेबांधणी अन्‌ अभियानाचे इन्चार्ज

भगीरथ भालके यांच्यासोबत हा गट शिवसेनेत जाणार नसल्याची चर्चा पंढरपूर शहरात सुरू आहे. भालके यांच्या शिवसेना प्रवेशाच्या निर्णयावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात, याकडे पंढरपूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 bhagirath bhalke
Baramati Bypoll : हर्षवर्धन सपकाळांची मोठी घोषणा : आज माघार घेतोय; पण 2029 मध्ये बारामतीत काँग्रेसचाच आमदार असेल...

आमचा स्वतंत्र वेगळा गट : नागेश भोसले

याबाबत नागेश भोसले म्हणाले, भगीरथ भालके यांच्याशी आमचा कसलाही संबंध नाही. तीर्थक्षेत्र विकास आघाडी आमची आहे, त्यामुळे व्हीपचा अधिकार इतर कोणालाही नाही. आमचा स्वतंत्र वेगळा गट आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यापूर्वी मंगळवेढ्यात बबनराव आवताडे यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी भालकेंपासून वेगळा गट तयार केला आहे. आम्ही तुमच्यासोबत असल्याचेही त्यांनी आम्हाला सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com