Mahavikas Aghadi News
Mahavikas Aghadi NewsSarkarnama

Mahavikas Aghadi News : अखेर ठरलं! महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा 'या' तारखेला सुटणार

Assembly Elections Maha Vikas Aghadi allotment of seats : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची उत्सुकता संपणार आहे. कारण आघाडीने जागा वाटपा संदर्भात एक बैठक आयोजित केली आहे. यामध्ये घटक पक्षांना विधानसभेसाठी किती जागा द्यायच्या हे ठरवलं जाणार आहे.
Published on

Mumbai News, 31 July : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. महाविकास आघाडी असो वा महायुती दोन्ही बाजूच्या मित्र पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार? याची उत्सुकता नेत्यांसह कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.

मात्र, आता निदान महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपाची उत्सुकता संपणार आहे. कारण आघाडीने जागा वाटपा संदर्भात एक बैठक आयोजित केली आहे. यामध्ये घटक पक्षांना विधानसभेसाठी किती जागा द्यायच्या यावर चर्चा केली जाणार आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतची बैठक 7 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार असून यावेळी तिन्ही पक्षांचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे लवकरच काँग्रेस (Congress), शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेला किती जागा लढवणार याबाबतच गणित स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. आघाडीतील नेत्यांना तर लोकसभेच्या यशामुळे विधानसभा लढण्यासाठी चांगलं बळ आलं आहे. त्यामुळेच आघाडीतील काही नेत्यांनी तर स्वबळाचा नारा देखील दिला आहे.

Mahavikas Aghadi News
Sudhir Patil Join Shiv Sena: मराठवाड्यात CM शिंदेंचा फडणवीसांना दे धक्का; सुधीर पाटलांनी हाती घेतला 'धनुष्यबाण'

मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मात्र आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तरीही प्रत्येक नेता आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त जागा मागणार यात शंका नाही. त्यामुळे आता आघाडीच्या बैठकीत राज्यातील विधानसभेच्या 288 जागांचं वाटप कसं होणार? आणि आघाडीतील तीन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी किती जागा येणार? याच चित्र 7 ऑगस्टला स्पष्ट होईल.

Mahavikas Aghadi News
Sharad Pawar Politics : धनंजय मुंडे, मुश्रीफ, वळसे पाटलांच्या मतदारसंघासह 'या' 20 जागा शरद पवारांनी हेरल्या; हुकमी पत्ता काढणार?

जयंत पाटील, नाना पटोलेंशी फोनवरुन चर्चा

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी मातोश्रीवर चर्चा झाली. जागा वाटपासाठी सात तारखेला मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.

तसंच बैठकीत जागा वाटपासह इतर विषयांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसंच मी उद्धव ठाकरेंना भेटलो यावेळी आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com