Karad News: संजय राऊत राजकारणातील अदखलपात्र पात्र... शहाजीबापू

Shahaji Bapu Patil कऱ्हाड (जि.सातारा) येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी आमदार शहाजीबापू पाटील आले होते.
Shahajibapu Patil, Sanjay Raut
Shahajibapu Patil, Sanjay Rautsarkarnama

Karad News : संजय राऊत Sanjay Raut यांना एकदा तरी भडक विधान केल्याशिवाय त्यांचा दिवस चांगला जात नाही. त्यामुळे त्या पात्राची महाराष्ट्राने फार दखल घ्यावी, असे काही नाही. राजकारणातील अदखलपात्र पात्र अशी गणना संजय राऊतांची झालेली आहे, अशी टीका बाळासाहेबांची शिवसेना Shivsena गटाचे आमदार शहाजीबापू पाटील Shahajibapu Patil यांनी केली.

कऱ्हाड (जि.सातारा) येथे आयोजीत एका कार्यक्रमासाठी आमदार शहाजीबापू पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, संजय राऊतांनी घडवलेल्या आय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अन् शिवसेनेचे ते बौध्दिक किंगमेकर झाले होते.

मात्र, त्यांची सत्ता जावुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आल्याने त्यांना हा टोला बसलेला असुन त्यांच्या तो जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे ते रोज सकाळी उठल्यानंतर काहीतरी बोलत राहतात. त्यात कुठलेही तथ्य नाही, तो एक राजकीय डावपेचातील एक भाग आहे.

Shahajibapu Patil, Sanjay Raut
Karad : बेजबाबदार सरकारमुळे राज्यातील युवकांचे भवितव्य अंधारात.. पृथ्वीराज चव्हाण

त्यामुळे त्या पात्राची महाराष्ट्राने फार दखल घ्यावी असे काही नाही. अदखलपात्र अशी गणना संजय राऊतांची झालेली आहे. श्री. पाटील म्हणाले, जोगेंद्र कवाडे हे एक आंबेडकरवादी चळवळीतील प्रभावी नेते आहेत. त्याचे विचार, वक्तृत्व प्रभावी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना गटाला या युतीचा मोठा फायदा होईल.

Shahajibapu Patil, Sanjay Raut
Shambhuraj Desai : 'शहाजीबापूंचं घर त्यांच्या डोळ्यात खुपतंय, अंधारेंना कावीळ झालाय!'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com