Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग थेट भूसंपादनाच्या टप्प्यावर; सांगलीसह 10 जिल्ह्यात संघर्ष उफाळणार! कोल्हापूरला मात्र दिलासा

Shaktipeeth Highway land acquisition orders : अखेर कोल्हापुरकरांच्या तीव्र विरोधाला यश आले असून शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरमधून वगळण्यात आला आहे. पण सांगलीसह इतर राज्यातील 11 जिल्ह्यातील भूसंपादनाचा आदेश पारीत झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.
Shaktipeeth Highway-Devendra Fadnavis
Shaktipeeth Highway-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. कोल्हापुरकरांच्या तीव्र आंदोलनानंतर शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरमधून वगळण्यात आला आहे.

  2. मात्र सांगलीसह 11 जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाचा आदेश पारीत झाला आहे.

  3. त्यामुळे पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गाचा वाद तापण्याची शक्यता आहे.

Kolhapur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला आणखी वेग आला आहे. कोल्हापूर जिल्हा वगळून सांगलीसह 11 जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाचे आदेश देण्यात आले आहेत. पण शेतकऱ्यांचा विरोध बघता थेट भूसंपादनाचा आदेश पारीत केल्याने राज्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित महामार्गद्वारे राज्यातील 12 जिल्ह्यातील 19 देवस्थान जोडली जाणार असून वर्धा जिल्ह्यातून पवनार येथून सुरुवात होणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे या महामार्गाचा शेवट होणार आहे. या महामार्गासाठी एकूण शेतकऱ्यांची 9385 तर वन विभागाची 265 हेक्टर जमीन भूसंपादन केली जाणार आहे. तर एकूण 86 हजार 300 कोटी इतका निधी खर्च होणार आहे.

Shaktipeeth Highway land acquisition orders
Shaktipeeth Highway land acquisition orderssarkarnama
Shaktipeeth Highway-Devendra Fadnavis
Shaktipeeth highway survey Parbhani : 'शक्तीपीठ'साठी आले, पोटभर जेवण करून गेले; परभणीत मोजणी अधिकाऱ्यांसोबत नेमकं काय घडलं?

दरम्यान भूसंपादनासाठी राज्य सरकारने 20 हजार 787 कोटी मंजूर करण्यात केले आहेत. सरकारनं विरोध डालवत शक्तिपीठ महामार्गाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. पण राज्य सरकारने कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या विरोध पाहता भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळलंय.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवला होता. त्यावेळी महायुती सरकारने शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळले होते. त्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर माहिती दिली होती. पण आता नव्याने शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन सुरू झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची आंदोलन, निदर्शने केली होती. त्यामुळे आता भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे.

Shaktipeeth Highway-Devendra Fadnavis
Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गावरुन भाजपात उभी फूट! आमदार, पदाधिकाऱ्यांत मतभेद; कोल्हापुरात नेमकं काय सुरुए

FAQs :

प्र.१. कोल्हापूरमधून शक्तिपीठ महामार्ग का वगळला?
उ. स्थानिकांचा तीव्र विरोध आणि आंदोलनामुळे कोल्हापूर शहरातून हा महामार्ग वगळण्यात आला.

प्र.२. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये भूसंपादन होणार आहे?
उ. सांगलीसह इतर 11 जिल्ह्यांमध्ये भूसंपादन आदेश पारीत झाला आहे.

प्र.३. वाद पुन्हा का पेटू शकतो?
उ. भूसंपादनामुळे शेतकरी व स्थानिकांच्या जमिनींवर परिणाम होणार असल्याने असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com