

Shaktipeeth Highway News: "शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढ्यात राजू शेट्टी शेवटपर्यंत असणार. मला त्यांच्यावर विश्वास आहे, पण त्यांचा माझ्यावर नाही." असा मिश्किल टोला लगावत माजी मंत्री जयंत पाटील यांनी "शक्तिपीठ महामार्गाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खाते आहे. पण निर्णय फडणवीस घेतात त्यामुळे कोणाला भेटायचे हा प्रश्न आहे." या शब्दांत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने काढलेल्या मोर्चात ते बोलत होते.
" न मागितलेल्या महामार्गाच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरलो आहे. आम्हाला पानंद आणि इतर रस्त्याची गरज आहे. ते करत नाही. नाव शक्तीपीठ आहे. मात्र अनेक भाविकांना वर्षाला पंढरपूरला जायला लागते. त्याच पंढरपूर पासून लांब रस्ता जात आहे. मग या रस्त्याची आखणी कशासाठी?" असा सवाल त्यांनी केला.
"गडचिरोलीला नवीन खाण सुरू झाली आहे. तो माल गोव्यात पोहोचवायचा आहे. गोव्याच्या उद्धारासाठी हा महामार्ग होत आहे. तर त्याचा विरोध करायला हवा. वर्ध्यापासून शक्तीपीठ महामार्ग होत आहे. नागपूर, भंडारा, गोंदियाला देवस्थानं नाहीयेत का? तेथे का शक्तीपीठ महामार्ग जात नाही. आपल्या सातारा - कोल्हापूरचा राष्ट्रीय महामार्ग होत नाही, मुंबई - गोवा रस्ता होईना. हातात असलेले प्रकल्प होईनात." अशा शब्दात जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना ठणकवले.
" पेट्रोल दर १११ रुपयांवर पोहोचले आहेत. गॅस दर वाढले आहेत. सरकार यावर बोलत नाही. मोदींच्या हातात काहीही राहिलेले नाही. अमेरिकेला आपले पंतप्रधान घाबरत आहेत की काय? असा प्रश्न आहे. रुपया घसरला आहे. देशावर कर्जाचा डोंगर आहे. अनेक महत्वाचे प्रश्न आहेत मात्र यांना असे रस्ते करायचे आहेत." असेही ते म्हणाले.
" पण या जिल्ह्यात मोजणी करणे अशक्य आहे. कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात वेगळा आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा या जिल्ह्यात वेगळी ताकद आहे. एखादा लढा हातात घेतला तर तो शेवट पर्यंत इथली लोकं घेऊन जातात." असे म्हणत जयंत पाटलांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात काढलेल्या मोर्चाला संबोधित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.