Satara Drought Issue : शंभूराज देसाईंची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव; ‘त्या’ पाच तालुक्यांना दुष्काळी लाभ मिळणार

Shambhuraj Desai Meet Fadnavis-Shinde : सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून पाच तालुके वगळण्यात आले आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी वगळलेल्या तालुक्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ देण्याची मागणी केली.
Shambhuraj Desai-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Shambhuraj Desai-Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Karad, 29 September : सातारा जिल्ह्यातील सातारा, माण, खटाव, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, पाटण, वाई, कऱ्हाड, जावळी, कोरेगाव या तालुक्यांना दुष्काळी यादीतून वगळण्यात आले आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली असून पाटण, वाई, कऱ्हाड, जावळी, कोरेगाव या तालुक्यांनाही दुष्काळी उपाययोजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देसाईंच्या मागणीची दखल घेत मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

राज्यात जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील सातारा, माण, खटाव, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, पाटण, वाई, कऱ्हाड, जावळी, कोरेगाव तालुक्यांचा या यादीत समावेश झालेला नाही. या तालुक्यांमध्येही पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतीपिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यांचा दुष्काळी क्षेत्रात समावेश करण्याची मागणी मंत्री देसाई यांनी केली आहे.

पाटण तालुक्यातील परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे शंभूराज देसाई यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तालुक्यात एकूण १४ महसूल मंडले असून, त्यापैकी नऊ महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित पाच महसूल मंडलांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पावसाअभावी पिके करपण्याच्या मार्गावर असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पाटणप्रमाणेच वाई, कऱ्हाड, जावळी, कोरेगाव तालुक्यांमध्येही पावसाच्या खंडामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता पावसाच्या खंडाचा पिकांवर झालेला प्रत्यक्ष परिणाम लक्षात घेऊन दुष्काळी निकषांनुसार या तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी मंत्री देसाईंनी केली आहे.

Shambhuraj Desai-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Phaltan Politic's : रामराजेंनी अखेर डाव टाकलाच : शिवरूपराजे खर्डेकरांची सातारा DCCतील एन्ट्री रोखण्यासाठी निंबाळकरांची तिरकी चाल...

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळावा, यासाठी मंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे ही बाब मांडली. मुख्यमंत्री फडणवी, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने या मागणीवर सरकारी पातळीवर पुढील कार्यवाहीला वेग येण्याची अपेक्षा आहे.

Shambhuraj Desai-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Yavatmal DCC Bank : जिल्हा बँकेचा ‘बिनविरोध’ प्लॅन अडचणीत : काँग्रेसच्या 4 जागांच्या मागणीने जागावाटपाचा फॉर्म्युला बिघडला!

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आता सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांबाबतही दुष्काळी निकषांच्या आधारे निर्णय होण्याची प्रक्रिया आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com