Patan Political News : मंत्री शंभूराज देसाईंच्या मतदारसंघात धडकणार 'पिवळे' वादळ...

Dhangar Reservation March : रविवारी धनगर समाज बांधवांचा मोर्चा
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

Patan Political News : मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात 'पिवळे' वादळ धडकणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाटण तालुका धनगर समाजाच्या वतीने रविवार, दि. १० रोजी सकाळी ११ वाजता शहरातील चाफोली रोड ते झेंडाचौका मार्गे तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येने भव्य, धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा पाटण तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

धनगर Dhangar समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या ७४ वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. महाराष्ट्र शासनाने त्याची अंमलबजावणी न करता अनेक वेळा आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली आहे. सकल धनगर समाज पाटण तालुक्याच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

Shambhuraj Desai
Nagpur Winter Session : उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच 'नॉन सीरियस'! परिणय फुकेंची टोलेबाजी

आरक्षणाची अंमलबजावणी करून एसटीचे प्रमाणपत्र वितरीत करावे. महाराष्ट्रात गाई, म्हैशी, शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा. राज्य शासनाने एक हजार कोटींची तरतुदीची तातडीने करावी. पाटण येथे शासनाने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारावे. या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

याबाबतचे निवेदन तहसीलदार पाटण व उपविभागीय कार्यालय पाटण, पाटण पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्या मतदारसंघात धनगर समाज आंदोलन करणार असल्याने प्रशासन लक्ष ठेवून आहे.

Edited By : Amol Sutar

Shambhuraj Desai
Nanded Political News : नांदेडला 'बीआरएस'साठी आगामी काळ कसोटीचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com