Shambhuraje Desai Political News : समोरच्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये कधीही कमी समजू नये. प्रतिस्पर्धी समोर त्याच ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे असते. कोल्हापूरची विद्यमान जागा शिवसेनेचे (Shivsena) आहे, महायुतीत ही जागा शिवसेना लढवणार आहे. मागील वेळेपेक्षा जास्त मताने शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल. ज्यांचे राजकीय विचार वेगळे होते ते आता एकत्र आले आहेत. आम्ही एक जीवाने आता काम करत आहोत. आम्ही सर्वजण ताकद लावून मागच्या पेक्षा जास्त बहुमताने ही जागा जिंकू, असा विश्वास मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पाठिंबा दिल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद महाराष्ट्रात वाढली असून राज्यात 45 प्लस आणि देशात 400 पेक्षा जास्त जागा निवडून येण्याला अधिक भक्कम पणा आला आहे. राज्यात महायुती आणखी ताकतीने काम करेल. असा विश्वास शंभूराजे देसाई यांनी व्यक्त करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा की, महायुतीमधून निवडणूक लढवायची. मते मागायची आणि ज्या महायुतीला लोकांनी निवडून दिलं ती युती सोडून दुसऱ्या बरोबर सरकार स्थापन करायचं. असे स्पष्टीकरण देसाई यांनी दिले. फोडाफोडीच्या राज ठाकरेंनी सातत्याने भाजप व शिवसेनेवर टीका केली होती. त्या विधानाला धरून देसाई यांनी स्पष्टीकरण दिले.
राज्यात अजून काही जागावर महायुतीत मतभेद आहेत. त्यावर बोलताना, देसाई यांनी 12 तारखेला निवडणुकीचे अर्ज भरण्याची नोटिफिकेशन निघणार आहे. त्यापूर्वीच जागा वाटपामध्ये महायुतीमध्ये समन्वयाने सन्मानजनक मार्ग निघेल. अशी प्रतिक्रिया देत शंभूराजे देसाई यांनी सातारा लोकसभेचा (Satara Loksabha) प्रश्न लवकरात लवकर सन्मान जनक भूमिकेतून सोडवला जाईल, असे स्पष्ट केले.
काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांच्या अपघातावरून बोलताना, त्या प्रकाराची चौकशी स्थानिक पोलिस करतील. जर कोणाला त्याबाबत शंका वाटत असेल तर त्याची तक्रार करावी. कोणावर संशय असेल तर त्याचं नाव द्यावे पोलिस योग्य ती कारवाई करतील. अशा सूचना शंभूराजे देसाई यांनी केल्या.
45 पेक्षा अधिक या बहुमतासाठी आम्ही कामाला लागलो आहे. महाविकास आघाडीला MVA उमेदवार मिळतात का नाही? त्यांचा उमेदवार त्यांच्यासोबत राहतो का नाही हे बघायचं आमचं काम नाही. आमचे तिन्ही नेते सक्षम आहेत, स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी आमचे तिन्ही नेते कामाला लागले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखील त्याच तयारीत आहोत. असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
सामनातून संजय राऊत (Sanjay Raut) टीका करण्यापलीकडे काही करत नाहीत. त्यांच्याकडून राज्याच्या हिताचं देशाच्या हिताच सकारात्मक लिखाण कधी झालंय का? गेल्या पावणेदोन वर्षांपासून केवळ टीका करणे व्यतिरिक्त काही नाही. संजय राऊत आता सामनात काय लिहितात हे वाचण्याइतपत लोकांमध्ये आता उत्सुकता राहिली नाही. असा टोला देसाई यांनी लगावला.
Edited By: Rashmi Mane
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.