Deputy CM Devendra Fadnavis & Ajit Pawar
Deputy CM Devendra Fadnavis & Ajit PawarSarkarnama

Kartiki Yatra: 'कार्तिकी' शासकीय महापूजा पेच कायम; अजितदादांच्या नावाची चर्चा असताना मनोज जरांगेंच्या...

Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाच्या भूमिकेमुळे नवा वाद
Published on

Pandharpur : यंदाच्या कार्तिकी महापूजेसाठी कोणाला निमंत्रण द्यायचे, याचा मंदिर समितीच्या पुढे पेच आहे. अशातच आता कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच मराठा क्रांती मोर्चाच्या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.

अजितदादांच्या हस्ते पूजा व्हावी, यासाठी पोलिस विभागाने सकारात्मकता दर्शवल्याचे समजते. पण शासकीय महापूजा मनोज जरांगे यांच्या हस्ते सपत्नीक करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज (गुरुवारी) केली आहे.

Deputy CM Devendra Fadnavis & Ajit Pawar
Dilip Walse Patil: वळसे पाटलांना मराठा आंदोलकांचा धसका; पत्र प्रसिद्ध करीत कार्यक्रम केला रद्द

राज्याला प्रथमच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या रूपाने दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी महापूजेसाठी कोणाला निमंत्रण द्यायचे, याचा मंदिर समितीपुढे पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडविण्यासाठी मंदिर समितीने विधी व न्याय विभागाकडे पत्र देऊन अभिप्राय मागितला आहे. अद्याप समितीला कोणताही अभिप्राय मिळाला नाही. त्यामुळे हा पेच कायम आहे.

सकल मराठा समाजाने मात्र उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते करण्यात येणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध केला आहे. आषाढीची मुख्यमंत्र्यांच्या तर कार्तिकीची उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. अजित पवार पंढरपुरात येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता मराठा क्रांती मोर्चाने मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते महापूजा करावी, अशी मागणी केली आहे.

Deputy CM Devendra Fadnavis & Ajit Pawar
Maratha Reservation : मराठा म्हणून जन्मलो हा गुन्हा आहे का? आणखी एक मराठा युवकाची आत्महत्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com