Sharad Pawar: दुःख उराशी बांधत, नीरा नदी प्रदूषणाचा शरद पवारांनी घेतला आढावा; प्रशासनाला दिले निर्देश

Nira River Pollution News : नीरा नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे शेतकरी त्रस्त असून, शरद पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
Sharad Pawar inspects polluted water of the Nira River at Niravagaj near Baramati after farmers raised concerns over environmental damage, crop loss, and drinking water contamination.
Sharad Pawar inspects polluted water of the Nira River at Niravagaj near Baramati after farmers raised concerns over environmental damage, crop loss, and drinking water contamination.Sarkarnama
Published on
Updated on

Baramati Nira River News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली असतानाही, हे अपार दुःख उराशी बांधत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीकरांच्या जनहितासाठी आज दुपारी घराबाहेर पडत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेत पवार यांनी निरावागज हद्दीतील नीरा नदीच्या वाढत्या प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली.

नीरा नदीतील पाण्याचे प्रदूषण गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या शेती, पिण्याचे पाणी आणि आरोग्यावर बसत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत हा विषय थेट पवार यांच्या निदर्शनास आणून दिला.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, मदनराव देवकाते, प्रल्हाद वरे, गणपतराव देवकाते, सागर देवकाते यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. “नीरा नदीतील प्रदूषण हा केवळ पर्यावरणाचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. प्रदूषित पाण्यामुळे पिकांचे नुकसान होत असून जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

Sharad Pawar inspects polluted water of the Nira River at Niravagaj near Baramati after farmers raised concerns over environmental damage, crop loss, and drinking water contamination.
Ajit Pawar Plane Crash : बारामती विमानतळ असुरक्षितच; शून्य उपाययोजना : 10 वर्षांत 9 अपघात

शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत शरद पवार यांनी नदीतील प्रदूषणास कारणीभूत घटकांची सविस्तर माहिती घेतली. संबंधित औद्योगिक घटक, सांडपाणी व्यवस्थापन आणि प्रशासकीय हलगर्जीपणा यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.  “शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. याबाबत संबंधित यंत्रणांशी तातडीने चर्चा करून ठोस उपाययोजना करण्यात येतील,” असे आश्वासन पवार यांनी दिले.

Sharad Pawar inspects polluted water of the Nira River at Niravagaj near Baramati after farmers raised concerns over environmental damage, crop loss, and drinking water contamination.
Baramati Airplane Crash: बारामती विमान अपघातात अजितदादांसह आणखी एक हळहळणारी 'एक्झिट',राष्ट्रवादीच्या नेत्यानं मुलगी गमावली

अत्यंत दुःखद प्रसंगातूनही जनतेसाठी रस्त्यावर उतरलेले शरद पवार पाहून उपस्थित शेतकऱ्यांच्या भावना भारावून गेल्या. नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर संकटातही लोकांसोबत उभे राहणे असते, याचा प्रत्यय आजच्या पाहणीतून आला, अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com