शरद पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात सीमा आंदोलनातील लाठीमाराचा किस्सा सांगितला.
या वेळी छगन भुजबळ पोलिसाच्या वेशात होते तर पवार ड्रायव्हर बनले होते.
या आठवणींनी सीमा प्रश्नाच्या संघर्षातील त्याग व कठीण प्रसंग अधोरेखित केले.
Pune News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्ना संदर्भात आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लढा दिला आहे. या सीमा प्रश्नाच्या सत्याग्रहाच्या लढ्यामध्ये अनेकांना लाठ्या काठ्या खाव्या लागल्या. याबाबतचे किस्से अनेक जण सांगतात. पुण्यातील एका कार्यक्रमात एसाच एक किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला. त्यांनी सीमा प्रश्नाच्या सत्याग्रहात आपल्याला देखील कशाप्रकारे पाठीवर लाट्या खाव्या लागल्या होत्या याबाबतचा किस्सा सांगितला आहे.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासाठी समितीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये सरचिटणीस पदाची विशेष जबाबदारी किशोर पवारांकडे होती. एस एम जोशी अध्यक्ष होते. बैठक झाली आणि बैठकीत ठरलं सत्याग्रह करायचा. निर्णयात बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासह आणखी अनेक लोक होते. त्या बैठकीमध्ये निर्णय हा झाला सत्याग्रहाची पहिली तुकडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात जाईल. त्यामुळे हा निर्णय झाला की बेळगावला जाऊन सत्याग्रह करायचा आणि सीमा भागाची मागणी करायची.
ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. आमच्या कानावर काही लोकांनी घातलं होतं "कागलच्या जवळ पोहोचल्यानंतर तुमची गाडी अडवली जाईल आणि तुम्हाला अटक केला जाईल". काहीही करून तर आम्हाला जायचं होतं. निर्णयही घेतला होता. समितीचा निर्णयही झाला होता. सत्याग्रहाची पहिली तुकडी त्याच्यात माझं नाव आणि त्यामुळे मला गेलंच पाहिजे हा निर्णय आम्ही लोकांनी घेतला. शेवटी जायचं कसं तर शेवटी कागलच्या जवळपास वेश बदलला आणि गाडीचा ड्रायव्हर मी झालो.
आधीचा ड्रायव्हर मागे बसवला आणि ती गाडी आम्ही बेळगावच्या दिशेने नेली. सीमा भागाची सुरुवात जिथून होते त्या कागलच्या पुढे गाडी थांबवली. कर्नाटकच्या पोलिसांनी विचारलं, "कौन है?" आम्ही म्हटलं, "हम है" ते म्हणाले, "हम कौन?" मी म्हटलं, "हम है कासीरभाई" मग ते म्हणाले, "अच्छा और कौन है?" आणि बघितलं गाडीत तर एक दोन लोक होते बाकी कोणी नव्हतंच. कारण गाडी मी चालवत होतो पाठीमागे ड्रायव्हर बसला होता. त्याने मग काही संशय घेतला नाही आणि गाडी आमची सोडली.
गाडी सोडल्यानंतर बेळगाव गेलो आणि तिथे गेल्यानंतर सत्याग्रह केला. त्यावेळेला कर्नाटकचे पोलीस अत्यंत रागावलेले होते. त्यांनी सत्याग्रहींवर लाठी हल्ला केला. आम्हाला दहा-बारा लाठ्या बसल्या आणि अटकही झाली. अटक झाल्यानंतर बेळगावच्या जवळ एक धरण आहे, हिडकल डॅम. आम्हाला पकडून तिथे नेऊन ठेवलं. एस एम जोशींना हे कळाल्यानंतर एस एम तिथे आले. ज्या धरणावर आम्हाला अटक करून ठेवलं होतं तिथे आले. त्यांना कोणी अडवलं नाही आणि आम्हा लोकांना भेटले आणि आम्हा लोकांचा विश्वास वाढवला. मला सांगायचं कौतुक असं की माझ्या पाठीवर सात-आठ लाठ्या बसलेल्या होत्या. पण एस एम जोशींनी प्रेमाने पाठीवर हात फिरवला आणि त्यानंतर सुटका झाल्यानंतर किशोर पवार आणि बाकीच्या सगळ्यांनी हा सत्याग्रहाचा कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा हा निर्णय घेतला.
त्यानंतरची दुसरी तुकडी ही निहाल अहमद आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होती. छगन भुजबळांनी गमतीच केल्या. त्यांनी गोव्याच्या भागातून जायचं ठरवलं. त्यांनी पोलीस अधिकाऱ्याचे कपडे घातले आणि त्यानंतर त्यांना जेव्हा अडवलं आणि विचारलं की, "कौन है ?" त्यांनी सांगितलं, "हम होमगार्ड है" होमगार्ड म्हटल्यानंतर त्यांची ही गाडी सोडण्यात आली. मग पुन्हा एके ठिकाणी त्यांना अडवलं ओळखलं आणि त्यांना तीन महिने तिथल्या तुरुंगामध्ये टाकलं. आमची सुटका त्यादिवशीच झाली पण भुजबळांना मात्र तिथे महिना दोन महिना राहावं लागलं. पण यासगळ्यात 9 लोक तिथे हुतात्मा झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
प्र.१: शरद पवार यांनी सीमा आंदोलनाबाबत काय सांगितले?
➡️ त्यांनी सांगितले की आंदोलनादरम्यान त्यांना स्वतःलाही लाठीमार सहन करावा लागला.
प्र.२: छगन भुजबळ यांचा किस्सा कोणता?
➡️ भुजबळ यांनी आंदोलनादरम्यान पोलिस वेश घेतला होता.
प्र.३: शरद पवार कोणत्या भूमिकेत होते?
➡️ त्यांनी स्वतः ड्रायव्हरचा वेश घेतला होता आणि आंदोलनात भाग घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.