Sharad Pawar : तब्यतेची विचारपूस करायला आलेल्या शरद पवारांना प्रभाताई झाडबुकेंनी बांधली राखी!

Sharad Pawar Meet Prabhatai Zhadbuke : प्रभाताई झाडबुके या बार्शीच्या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. श्रीमती झाडबुके या बार्शी विधानसभा मतदारसंघातून 1962 आणि 1967 या दोन पंचवार्षिकला निवडून आल्या होत्या. झाडबुके या दोन्ही वेळा काँग्रेसच्या तिकिटावर बाशीतून निवडून आलेल्या आहेत.
Prabhatai Zhadbuke-Sharad Pawar
Prabhatai Zhadbuke-Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 August : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बार्शीच्या माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची घरी जाऊन भेट घेतली.

पवारांनी प्रभाताई यांच्या तब्यतेची विचारपूस केली. वयाची 90 पार केलेल्या प्रभाताईंनी घरी आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार (वय 84) यांना राखी बांधून एक आठवडाअगोदरच राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी आज शरद शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट माजी आमदार प्रभाताई झाडबुके (Prabhatai Zhadbuke) यांचे घर गाठले. माजी आमदार झाडबुके या सध्या नव्वद वर्षांच्या आहेत. त्यांची तब्येत सध्या ठीक नसते, त्यामुळे पवारांनी घरी जाऊन झाडबुके यांची विचारपूस केली.

प्रभाताई झाडबुके या बार्शीच्या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. श्रीमती झाडबुके या बार्शी विधानसभा मतदारसंघातून 1962 आणि 1967 या दोन पंचवार्षिकला निवडून आल्या होत्या. झाडबुके या दोन्ही वेळा काँग्रेसच्या तिकिटावर बाशीतून निवडून आलेल्या आहेत. प्रभाताईंची तब्येत सध्या ठीक नसते, शरद पवार यांनी घरी जाऊन त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली.

Prabhatai Zhadbuke-Sharad Pawar
Video-Sharad Pawar Sabha : पवारांच्या बार्शीच्या सभेत मराठा आंदोलकांनी काळे झेंडे फडकावले, एकाने अंगावर पेट्रोल ओतून घेतले

रक्षाबंधनाच्या एक आठवडा अगोदर घरी आलेले शरद पवार यांचे औक्षण करून प्रभाताई झाडबुके यांनी त्यांना राखी बांधली. सुमारे पाच वर्षांनंतर बार्शी आलेल्या पवारांनी माजी आमदार झाडबुके यांची आठवण ठेवत त्यांची घरी जाऊन भेट घेत त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली. पवार यांनी झाडबुके यांच्या घरी दिलेल्या भेटीची सोलापूरमध्ये चर्चा रंगली आहे.

Prabhatai Zhadbuke-Sharad Pawar
Rohit Pawar Attacked Rajendra Raut : रोहित पवारांचा आमदार राऊतांवर हल्लाबोल; ‘कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकाल, तर गाठ आमच्याशी हाय’

दरम्यान, मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही इतिहास घडविण्याचे आवाहन केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना बार्शीतून पन्नास हजारापेक्षा जास्त मतांचे अधिक्य मिळाले आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार नेमकी काय खेळी खेळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com