Video-Sharad Pawar Sabha : पवारांच्या बार्शीच्या सभेत मराठा आंदोलकांनी काळे झेंडे फडकावले, एकाने अंगावर पेट्रोल ओतून घेतले

Maratha Reservation : एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे बार्शीत एकच खळबळ उडाली आहे.
Sharad Pawar Barshi  Sabha
Sharad Pawar Barshi SabhaSarkarnama
Published on
Updated on

Barshi, 11 August : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बार्शीतील सभेत मराठा आंदोलकांनी काळे झेंडे फडकावले तसेच, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.

एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे बार्शीत एकच खळबळ उडाली आहे.

बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले हेाते. त्या मेळाव्याला उपस्थित राहून शरद पवार (Sharad Pawar) हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. पवार बोलत असतानाच मराठा (Maratha) आंदेालक तरुणांनी सभेत काळे झेंडे फडकावले. पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेऊन सभेच्या बाहेर नेले. त्या वेळी त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही आंदोलक तरुणांनी दिल्या.

सभेत एका तरुणाने (Youth) अंगावर पेट्रोल ओतून घेतले. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, शरद पवार यांच्या सभेत युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याच्या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar Barshi  Sabha
Rohit Pawar Attacked Rajendra Raut : रोहित पवारांचा आमदार राऊतांवर हल्लाबोल; ‘कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकाल, तर गाठ आमच्याशी हाय’

शरद पवार यांनी आपल्या भाषणात शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नावर भाषणात उहापोह केला. तसेच, लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एका इतिहास घडविण्याचे आवाहन शरद पवार यांनी भाषणातून जनतेला केले. सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती अस्था नसणार आहे, ते बदलण्याची वेळ आलेली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar Barshi  Sabha
Video-Sharad Pawar : मराठा आंदोलकांनी कुर्डूवाडीजवळ अडवली शरद पवारांची गाडी

कुर्डुवाडीतही अडवली होती गाडी

दरम्यान, बार्शीत मेळाव्याला जात असताना शरद पवार यांची गाडी मराठा आरक्षण आंदोलकांनी माढा तालुक्यातील कुर्डूवाडीजवळ सकाळी अडवली होती. मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली होती, त्यावेळी शरद पवार यांनी ‘आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे’, असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर पवार हे पुढील प्रवासासाठी रवाना झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com