काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर दुसऱ्याच दिवशी चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. भाजपत प्रवेश केल्यानंतर चव्हाणांवर काँग्रेस, ठाकरे गटाकडून टीका केली जात होती. आता चव्हाणांच्या प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
"अशोक चव्हाणांचं उदाहरण आमच्या सगळ्यांना आश्चर्यकारक होते. पण, मला तितके आश्चर्यकारक वाटत नाही. कारण भाजपनं एक व्हाइट पेपर काढला होता. त्यात आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाणांचा उल्लेख होता. त्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की ही एकप्रकारे धमकी असण्याची शक्यता आहे. या धमकीचे परिणाम नंतर झाले," असं शरद पवारांनी सांगितलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. कारण इंडिया आघाडीतील पक्षांनी एकत्रित काम करावे. काही पक्ष राज्यापुरते मर्यादित आहेत. उत्तर प्रदेशमध्ये जागांवरून एकवाक्यता नाही. पश्चिम बंगालमध्ये काही अडचणी जास्त आहेत. तृणमूल काँग्रेस विरुद्ध सीपीएम आणि काँग्रेस असा वाद आहे. हे प्रश्न आम्ही अद्याप हाताळले नाहीत. या प्रकरणी वरिष्ठ नेत्यांमध्ये लवकरच चर्चा होईल," असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची चर्चा रंगली आहे. याकडे लक्ष वेधलं असता शरद पवारांनी म्हटलं, "काँग्रेस आणि आम्ही एकत्रच काम करत आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि आमच्यात काही वेगळेपणा नाही. एकत्र बसतो, चर्चा करतो याचा अर्थ विलीनीकरण करण्याची आवश्यकता नाही."
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.