Solapur Politic's : सोलापुरात पवारांच्या पक्षाला धक्का; राजू खरेंनंतर आणखी एका आमदाराची एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर हजेरी

Narayan Patil News : राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार शेवटपर्यंत पक्षासोबत राहणार की इतर पक्षांचा आश्रय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Narayan Patil
Narayan PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 June : भारतीय जनता पक्षाच्या सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. बनशेट्टी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि सोलापुरातील काँग्रेस नेते प्रा. अशोक निम्बर्गी यांची उपस्थिती ही चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे मोहोळचे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार राजू खरे हे उघडपणे शिंदेंच्या व्यासपीठावर दिसत असताना आता पक्षाचा आणखी एक आमदार शिंदेंच्या कार्यक्रमात दिसून आला आहे, त्यामुळे पवारांचे आमदार शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोलापूर (Solapur) महापालिकेच्या 2017 रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर शोभा बनशेट्टी या निवडून आल्या होत्या. त्या निवडणुकीत सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आली होती, पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका म्हणून शोभा बनशेट्टी यांना महापौर बनविण्यात आले होते.

आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत त्यांचा पुढील काळात राजकीय संघर्ष झाला, त्यामुळे शोभा बनशेट्टी यांनी भाजप (BJP) सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून विधानसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांनी आमदार देशमुख यांच्यावर जोरदार आसूड ओढले होते.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शोभा बनशेट्टी यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बनशेट्टी यांनी भगवा हाती घेतला आहे. शोभा बनशेट्टी यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापुरातील शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Narayan Patil
Solapur NCP SP : लॉजमध्ये घुसून महिलेचा विनयभंग; राष्ट्रवादीच्या माजी महापौराची पक्षातून हकालपट्टी

शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांच्या उपस्थितीची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. एकीकडे मोहोळचे पक्षाचे आमदार ‘मी नुसताच नावाला तुतारीवाला आहे. मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली आहे,’ असे म्हणत पक्षाच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळणारे आमदार राजू खरे हे एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात आवर्जून दिसून येत आहेत.

एकीकडे आमदार राजू खरे हे पक्षापासून दुरावत असल्याचे चित्र दिसत असतानाच आता नारायण पाटीलही एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार शेवटपर्यंत पक्षासोबत राहणार की इतर पक्षांचा आश्रय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आमदार नारायण पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे सोलापूर शहर प्रवक्ते अशोक निंबर्गी हेही उपस्थित होते.

Narayan Patil
Udayanraje Bhosale :खासदार उदयनराजेंच्या ड्रीम प्राेजेक्टला केंद्राचा हिरवा कंदील; आगामी निवडणुकीच्या तोंडावर ठरणार महत्वपूर्ण

शोभा बनशेट्टी यांच्या शिवसेना प्रवेशावेळी असलेल्या उपस्थितीबाबत आमदार नारायण पाटील यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. करमाळा मतदारसंघातील कामानिमित्त आमदार नारायण पाटील हे एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com