Sharad Pawar Sabha : पवारांचा शिंदे बंधूंवर हल्लाबोल; 'आतापर्यंत जे कौतुक झालं ते खूप झालं; यापुढे यत्किंचितही मदत नाही’

Assembly Election 2024 : करमाळा आणि माढ्यातील जे आमदार आहेत. त्यांना आम्ही अनेक वर्षे मदत केली, लोकांचे प्रश्न सोडवू, असा त्यांनी शब्द दिला होता. प्रमाणिकपणानं संघर्षात बरेाबर राहू, असंही सांगितलं होतं. पण आज ते कुठे गायब झाले आहेत, कळत नाही.
Sanjay Shinde-Sharad Pawar-Babanrao Shinde
Sanjay Shinde-Sharad Pawar-Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 November : करमाळा आणि माढ्यातील जे आमदार आहेत. त्यांना आम्ही अनेक वर्षे मदत केली, लोकांचे प्रश्न सोडवू, असा त्यांनी शब्द दिला होता. प्रमाणिकपणानं संघर्षात बरेाबर राहू, असंही सांगितलं होतं. पण आज ते कुठे गायब झाले आहेत, कळत नाही. ते लोकहिताची जपणूक करतात, असा माझा समज होता. पण त्यांनी स्वहितापलीकडे काही पाहिले नाही, जे स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात. त्यांना आपण यत्किंचितही सहकार्य करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार बबनराव शिंदे अणि संजय शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत निवडणुकीत त्यांना कसलीही मदत नसल्याचे स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे करमाळ्याचे उमेदवार, माजी आमदार नारायण पाटील (Narayan patil) यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, करमाळा आणि माढ्यातील जे आमदार आहेत. त्यांना आम्ही अनेक वर्षे मदत केली, लोकांचे प्रश्न सोडवू, असा त्यांनी शब्द दिला. प्रमाणिकपणानं संघर्षात बरेाबर राहू, असं सांगितलं गेलं. पण आज कुठे गायब झाले आहेत कळत नाही.

माढा आणि करमाळा मतदारसंघातील आमदारांनी तेथील जनतेला सीना नदीत बॅरेजेस उभारण्याचा आणि पाणी सोडण्याचा शब्द त्यांनी दिला होता. लोक सांगतात की त्यांनी हा शब्द पुरा केलेला नाही. लोकांमध्ये जातो, शब्द देतो आणि त्याची किंमत करत नाही, त्यांनी मत मागण्याचा अधिकार गमावला आहे, त्यांना आम्ही मतांचा जोगवा देणार नाही, हा निकाल तुम्हाला घ्यायचा आहे, असे आवाहन शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

पवार म्हणाले, ठीक आहे, तुम्ही तुमची कारखानदारी वाढली, त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. मी सोलापूर जिल्ह्याचा संपर्कमंत्री होतो, त्यावेळचं माझं रेकॉर्ड काढा. जास्तीत जास्त पैसे हे बबनदादा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना मी दिले आहेत. हा महाराष्ट्राच्या रेकॉर्डमधील हिस्सा आहे. ते कुठलेही काम घेऊन आले, तर माझी त्याला मान्यता असायची.

Sanjay Shinde-Sharad Pawar-Babanrao Shinde
Shiv sena's Manifesto : शिवसेनेचा ‘वचननामा’ निर्माण करेल का कुटुंबप्रमुखाचे प्रेम?

ते म्हणाले, शिंदे हे प्रमाणिकपणे जनतेच्या हिताची जपणूक करतात, असा माझ्यासारख्याचा समज होता. पण नंतरच्या काळात लक्षात आलं की, हे जे काही करतात, ते शेतकऱ्यांसाठी किंवा गावच्या लोकांसाठी नाही तर पहिलं आपलं हित, स्वतःचा स्वार्थ याशिवाय त्यांनी दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलेले नाही.

जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो. त्यांना आपल्याला यत्किंचितही सहकार्य करण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत जे कौतुक झालं, ते खूप झालं. या निवडणुकीत त्यांचं खरं चित्र आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता, याचा निर्णय तुम्हाला वीस तारखेच्या मतदानात घ्यायचा आहे, अस सांगून निवडणुकीत शिंदेंना मदत होणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Sanjay Shinde-Sharad Pawar-Babanrao Shinde
Dilip Mane : दिलीप मानेंची नेमकी भूमिका काय? स्वतः काडादीसोबत, तर समर्थकांचा देशमुखांना पाठिंबा!

नारायण पाटलांना निवडून द्या, प्रश्न सोडवतो

करमाळा मतदारसंघात आज पाणी, वीज यांसारखे प्रश्न आहेत, तुम्ही नारायण पाटील यांना निवडून द्या. हे प्रश्न सोडविण्यासाठी नारायणआबा, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, महाविकास आघाडीचे जे काही आमदार निवडून येतील, त्या सर्वांना घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतो आणि हे प्रश्न कसे सुटत नाहीत, हे आम्ही पाहतो. तुमच्या प्रश्नाची ताकद सोडण्याची ताकद नारायण पाटील यांच्यात आहे, त्यांच्या पाठीशी तुमची ताकद उभी करून मोठ्या मतांनी त्यांना निवडून द्या, असे आवाहनही पवार यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com