Satara News : विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. त्यांचा राज्यात सभांचा धडाका सुरू आहे. त्यातच आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्रासाठीही ताकद लावली आहे. सातारा येथे पवारांनी शनिवारी (ता.16) मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीवर घणाघाती टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार म्हणाले, त्यांच्या हातातून लोकसभेची निवडणूक गेल्यामुळे त्यांनी यावेळेस विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. पण, ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला जातो. कारण त्यांना निवडणुकीची खात्री राहिलेली नाही. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात चांगले वातावरण असताना खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय. ‘लव जिहाद’ हा शब्द प्रयोग करून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक प्रकारे राजकीय कलह तयार केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांच्या शनिवारी (ता.16) सातारा जिल्ह्यात चार सभा होत्या. त्यासाठी ते मुक्कामी होते. यावेळेस महाविकास आघाडीच्या पाठीशी लोकं उभी राहतील. कारण राज्यात लोकांना परिवर्तन हवं आहे, त्यामुळे यावेळेस परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पवार म्हणाले, बारामतीत नातवाच्या प्रचाराला प्रतिभाकाकी बाहेर पडल्या आहेत. यावर पवार म्हणाले, माझ्याच प्रचारासाठी नाही, पण याआधी सुद्धा घरातल्या इतर सदस्यांच्या प्रचारासाठी ही त्या बाहेर पडल्या आहेत. बारामतीमध्ये माझी अजून सभा झालेली नाही. राष्ट्रवादीला किती जागा मिळतील या प्रश्नावर त्यांनी किती जागा मिळतील, हे सांगायला मी ज्योतिषी नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
भाजपकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला आहे, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, त्यांना निवडणुकीची खात्री राहिलेली नाही. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये चांगले वातावरण असताना ते खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अनेक प्रधानमंत्र्यांची भाषणे मी ऐकले आहेत. मात्र, नरेंद्र मोदी भाषणाची सुरुवात 400 पार चा नारा देऊन करतात. याचा अर्थ घटनेची सुधारणा करणे. संविधान बदलण्याचं काम त्यांच्या मनामध्ये दिसत आहे,यामुळे संविधानाला धोका आहे.
बारामतीत लोकसभेला लोकांनी गंमत केली, अशी टिप्पणी अजित पवारांनी केली होती. त्यावर खासदार शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, बारामतीच्या जनतेचा तो अधिकार आहे. लोकांनी तुला बारामतीचा वाली म्हटलं पाहिजे. मी म्हणून काय उपयोग, असा सल्लाही त्यांनी दिला.
दोन कोटीहून अधिक महिलांना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे, याचा परिणाम होईल. तरीदेखील राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या हजारो घटना घडल्या आहेत. यामध्ये महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाणही जास्त आहे. आता ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांनी लोकसभेची निवडणूक हातातून गेल्यामुळे यावेळेस विधानसभा गांभीर्याने घेतली आहे. राज्यातील लोकांना परिवर्तन हवं आहे. ते निश्चित होईल,
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.