Sangola Politics : महाआघाडीत पुन्हा वाद पेटणार; सांगोल्यात उमेदवार कोण असणार?, रोहित पवारांनी सांगूनच टाकले

Rohit Pawar Statement : सांगोल्याच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेत पुन्हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. कारण सांगोल्यात शरद पवार हे देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहतील, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
Uddhav Thackeray-Sharad Pawar-Dr. Babasaheb Deshmukh
Uddhav Thackeray-Sharad Pawar-Dr. Babasaheb DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 20 October : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत जागा वाटपावरून चांगलाच वाद रंगला होता. तो वाद मिटतो न मिटतो तोच आघाडीत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण, सांगोल्याच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेमध्ये पुन्हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. कारण सांगोल्यात शरद पवार हे देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहतील, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने (PWP) एकही जागा न घेता महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. लोकसभेला ज्या प्रमाणे शेकापने महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला, त्याचपद्धतीने विधानसभा निवडणुकीत शेकापला हक्काच्या जागा सोडाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मतदारसंघावरून मारामारी सुरू आहे, त्यामुळे मित्रपक्षाला किती आणि कोणत्या जागा सुटणार, याची शाश्वती नाही.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वी दीपक साळुंखे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घेऊन सांगोल्यात उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे शेकापने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दुसरीकडे, रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवार हे देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असे स्पष्टच केले आहे.

Uddhav Thackeray-Sharad Pawar-Dr. Babasaheb Deshmukh
Manoj Jarange Patil : सोलापुरात रिक्षाचालकांपासून उच्चशिक्षित दीडशे जणांना जरांगे पाटलांकडून विधानसभा लढवायचीय!

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, गणपराव देशमुख कुटुंबीयांचे सांगोला आणि महाराष्ट्रात मोठे काम आहे. देशमुख कुटुंबीयांकडे पाहत असताना शरद पवार हे तर त्या कुटुंबाला मदत करतच आहेत. त्याच पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा देशमुख कुटुंबीयांना मदत करतील.

सांगोल्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष निवडणूक लढवेल. त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष अशीच लढत होईल, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray-Sharad Pawar-Dr. Babasaheb Deshmukh
Assembly Election 2024 : महाआघाडीला धक्का; शेकाप आठ जागांवर स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी दीपक साळुंखे यांना शिवसेनेत घेऊन त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिल आहेत, तर रोहित पवार यांनी शरद पवार हे सांगोल्यात देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहतील, अशी भावना व्यक्त केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत सांगोला मतदारसंघावरून पवार-ठाकरे पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com