Sharad Pawar’s NCP Politics : मतचोरीविरोधात आता शरद पवारांचा पक्षही मैदानात, सांगलीत घेतला मोठा निर्णय

Sharad Pawar’s NCP Joins Congress in Fight Against Electoral Fraud : देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीविरोधात रान उठवलं असून भाजप आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले जात आहेत. अशात आता मतचोरीविरोधातील ठिणगी आता सांगली जिल्ह्यातही पडली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. Rahul Gandhi ने भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप केले.

  2. काँग्रेस देशभरात आंदोलने करून अॅक्टिव्ह मोडमध्ये उतरली आहे.

  3. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीत महत्वाची बैठक घेतली.

  4. मतचोरीविरोधात नागरिकांमध्ये जागृती मोहीम राबवण्याचा निर्णय झाला.

  5. महाराष्ट्रात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.

Sangli News : देशात आजच्या घडीला काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मतचोरीविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. त्यांना मतचोरी मुद्द्यावरून रान उठवले असून भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात देखील काँग्रेस अॅक्टिव्ह मोडवर आली असून विविध जिल्ह्यात आंदोलने केली जात आहेत. अशातच आता जेष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही मैदानात उतरला आहे. पक्षाने सांगलीत याबाबत महत्वाची बैठक घेतली असून मतचोरीबाबत नागरिकांमध्ये जागृतीचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सांगलीत बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणूक, मतदार यादी यांबाबत आपली मते व्यक्त केली. यावेळी महालिंग हेगडे यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘त्यांच्या, तसेच लगतच्या प्रभागात किमान साडेतीनशे मतदारांची दोन्ही प्रभागांतील मतदार याद्यांमध्ये दोनदा नावे आली आहेत. सांगली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वारंवार ही बाब निदर्शनास आणून देऊनही निवडणूक शाखा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar Nashik Morcha : रोहित पवारांचं जबरदस्त नियोजन, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 50 हजार शेतकरी उतरणार रस्त्यावर!

सामाजिक न्याय विभागाचे उत्तम कांबळे यांनी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागातर्फे सांगली, मिरज व कुपवाड शहरात दौरा करण्यात येणार आहे, असे सांगितले. यावेळी महिला प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

त्या म्हणाल्या, हे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. ते सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे आहे. मात्र युती सरकार भांडवलदारांचे हितसंबंध जपण्याचे काम करत आहे. हे सरकार सामान्यांचे नाही, भांडवलदारांचे आहे. आयुब बारगीर म्हणाले, पक्षाचे नेते जयंत पाटील, शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यामुळे मला केवळ सहाशे रुपयांत स्वीकृत नगरसेवक केले. पक्षात काम करण्याला संधी नक्कीच मिळते.

महिला प्रदेश सरचिटणीस अनिता पांगम म्हणाल्या, महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे संपर्क अभियान राबवून महिला, तसेच नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राहील मुल्ला यांनी पक्षाची पुरोगामी प्रतिमा जपण्यासाठी ‘युवक’शाखेमार्फत महापालिका क्षेत्रात लवकरच विविध कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले.

Sharad Pawar
NCP Sharad Pawar Politics: गणपती हिंदू-मुस्लीम ऐक्याचा...डॉ. झाकीर शेख यांच्या गणपतीच्या आरतीला क्रीडामंत्री कोकाटेंसह नेत्यांनी केली गर्दी!

FAQs :

प्रश्न 1: राहुल गांधींनी कोणावर आरोप केले?
उत्तर: राहुल गांधींनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले.

प्रश्न 2: काँग्रेसने काय पाऊल उचलले आहे?
उत्तर: काँग्रेसने देशभरात आंदोलन सुरू केले आहे.

प्रश्न 3: शरद पवारांच्या पक्षाने काय निर्णय घेतला?
उत्तर: सांगलीत झालेल्या बैठकीत मतचोरीविरोधात जागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय झाला.

प्रश्न 4: या प्रकरणामुळे कुठे आंदोलने होत आहेत?
उत्तर: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत आंदोलने होत आहेत.

प्रश्न 5: मतचोरी मुद्द्यामुळे काय घडले आहे?
उत्तर: विरोधक एकत्र येऊन भाजपविरोधात मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com