Solapur, Madha Lok Sabha : ईडीनं ताणलं की मोहिते पाटील पुन्हा भाजपमध्ये जातील; 'वंचित'च्या उमेदवाराचं मोठं विधान

Ramesh Barsakar On Mohite Patil : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचं मनपरिवर्तन तुम्ही करू शकला नाहीत. स्वतःच्या भावाचं तुम्ही मनपरिवर्तन करू शकत नाहीत, तर जनतेचं मनपरिवर्तन तुम्ही कसं करणार आहात?
Ramesh Baraskar
Ramesh BaraskarSarkarnama

Solapur, 15 April : माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनुक्रमे रमेश बारसकर, राहुल गायकवाड यांनी आज (ता. 15 एप्रिल) सोलापूर शहरातून रॅली काढत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या वेळी माढ्याचे उमेदवार बारसकर यांनी मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ईडीनं ताणलं की मोहिते पाटील परत भाजपमध्ये जातील, असेही बारसकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या 6 जाहीर सभा होणार आहेत. त्यातील 4 सभा या माढ्यात आणि 2 सभा सोलापुरात (Solapur) होणार आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramesh Baraskar
Amol Kolhe Vs Ajit Pawar : पलटीसम्राट अन्‌ खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगला; कोल्हेंचा अजितदादांवर प्रतिहल्ला

वंचित आघाडीचे माढ्याचे उमेदवार रमेश बारसकर म्हणाले, अकलूजमध्ये रविवारी (ता. १४ एप्रिल) महाराष्ट्रातील 3 महत्त्वाचे नेते गोळा झाले होते. त्या तीन नेत्यांना जनता प्रश्न विचारात आहे की, मागच्या 50 वर्षांत विकास का झाला नाही. सोलापूर जिल्ह्याचा विकासाचा बॅकलॉग का भरून निघाला नाही, असा सवाल विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना जनता विचारत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी मोठं केलं नाही. रेडिमेड कार्यकर्त्यांकडे ताकद लावून तो आमचा आहे, असं त्यांच्याकडे नेहमीच म्हटलं जातं. धैर्यशील मोहिते पाटील यांना आमचा प्रश्न आहे की, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचं मनपरिवर्तन तुम्ही करू शकला नाहीत. स्वतःच्या भावाचं तुम्ही मनपरिवर्तन करू शकत नाहीत, तर जनतेचं मनपरिवर्तन तुम्ही कसं करणार आहात, असा सवाल बारसकर यांनी मोहिते पाटील यांना विचारला आहे.

Ramesh Baraskar
Mohite Patil Vs Satpute : सातपुतेंचे मोहिते पाटलांना प्रत्युत्तर; ‘सोलापूरकरांनी माझं पार्सल दिल्लीला पाठविण्याचं ठरवलंय’

मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये परतीची दारं रिकामी सोडलेली आहेत, त्यामुळं ईडीनं ताणलं की ते परत भाजपमध्ये जातील, अशी टीका बारसकर यांनी मोहिते पाटील यांच्यावर केली आहे.

बारसकर म्हणाले, शरद पवार यांनी सुनांचं अपमान करणारं विधान दुसऱ्यांदा केलं आहे. त्यांनी जाणूनबुजून हे वक्तव्य केलं आहे. भारत देशाच्या सुनेचा अपमान शरद पवार यांनी वेळोवेळी केला आहे. चुकून त्यांच्याकडून हे वक्तव्य झालं नाही. सोनिया गांधी यांच्यावेळीही त्यांनी असंच केलं होतं. त्याचपद्धतीने अजित पवार यांच्या पत्नीचा अपमानही त्यांनी केला आहे.

शरद पवार यांच्याकडून सुनांचं अपमान करणारं विधान दुसऱ्यावेळी झालं आहे. भारतातील सुना या त्यागी आहेत, त्यामुळे त्यागी माणसाची टिंगल करणे, हे योग्य नाही. महाराष्ट्रातील स्वाभिमानी सुना या राष्ट्रवादीला मतदान करतील का, याबद्दल शंका आहे, असेही ते म्हणाले.

R

Ramesh Baraskar
Narayan Patil Resign Shivsena : मोहिते पाटलांनंतर माढ्यात महायुतीला आणखी एक धक्का; माजी आमदार पाटलांचा शिवसेनेचा राजीनामा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com