Satara Lok Sabha Result : शंभूराज देसाईंच्या बालेकिल्यात शशिकांत शिंदेंना आघाडी!

Shashikant Shinde and Shambhuraj Desai : मंत्री देसाई यांनी विभागवार सभा घेऊन वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता.
Shashikant Shinde and Shambhuraj Desai
Shashikant Shinde and Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

- जालिंदर सत्रे

Satara Lok Sabha Constituency Election Result : लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी महाआघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. पाटण विधानसभा मतदारसंघात मात्र, शशिकांत शिंदे यांनी शेवटपर्यंत आघाडी टिकवून ठेवली. या मतदारसंघाचे प्रतिनिधी व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धोबीपछाड देत सत्यजितसिंह पाटणकर यांनी मित्रपक्षांना बरोबर घेत तीन हजारांवर मताधिक्य दिले आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पायाला भिंगरी लावून मतदारसंघात संपर्क वाढवला. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी आपल्यापरीने कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Shashikant Shinde and Shambhuraj Desai
Udayanraje Bhosale : जिंकले तरी उदयनराजेंची नाराजी; काय आहे कारण?

त्यांना महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, उपप्रमुख रवी पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांच्याबरोबर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य हिंदूराव पाटील, नरेश देसाई व कार्यकर्त्यांनी एकदिलाने साथ दिल्याने सन 2019च्या निवडणुकीत 14 हजारांवर मताधिक्याचे टार्गेट पूर्ण करून तीन हजारांवर मताधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) यांना दिले.

Shashikant Shinde and Shambhuraj Desai
Udayanraje Win In Satara Loksabha : कॉलरची शान वाढली; साताऱ्यात बाजी पलटली, उदयनराजेंनी मैदान मारलं

महाविकास आघाडीचे मित्रपक्ष त्यांचे नेते व कार्यकर्ते एकसंध पाहावयास मिळाले. मात्र, महायुतीत एकवाक्यता पाटण येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanavis) यांच्या सभेतही दिसली नाही. मंत्री शंभूराज देसाई राज्यातील राजकारणात व्यस्त आणि मीडियासमोर जास्त प्रमाणात सहभागी झालेले दिसले.

त्यातच मंत्री देसाई यांच्या निवासस्थानाशेजारच्या भिंतीवरील उदयनराजे भोसले यांच्या तैलचित्रावरून झालेला वाद, लोकनेत्यांच्या पोवई नाक्यावरील स्मारकावरून झालेला वाद, उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया याचा एकंदरीत परिणाम शशिकांत शिंदे यांना आघाडी देऊन गेला.

मंत्री देसाई यांनी विभागवार सभा घेऊन वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. याच संधीचा फायदा घेत महाविकास आघाडीच्या संघटित ताकदीने वातावरण निर्माण केले होते. माथाडी कामगारांनी माथाडींचा नेता म्हणून शशिकांत शिंदे यांना पाठबळ दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने हक्काचा माणूस म्हणून, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने झालेल्या गद्दारीचा राग व्यक्त केल्याने महाविकास आघाडीला तीन हजारांवर मताधिक्य मिळाले. निवडणूक काळातील एकूण परिस्थिती पाहता 15 हजारांचे मताधिक्य शशिकांत शिंदे यांना मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, तसे घडले नाही. पालकमंत्री असतानाही त्यांच्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य मंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा असून, सत्यजितसिंह पाटणकर यांना संघर्षासाठी बळ देणारे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com