Satara ZP President : सातारा ZP अध्यक्षपदाबाबत शिवसेना-राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; आता थेट हायकोर्टातून सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार...

Shivsena- NCP News : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून भाजपविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. सुनावणी रखडल्याने तक्रारदार आता उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
Satara ZP
Satara ZPSarkarnama
Published on
Updated on

Satara, 18 August : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना मतदानापासून रोखण्याच्या मुद्यावर राज्यभरात गाजली होती. बहुमत हाती नसतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडून भाजपने आपला जिल्हा परिषद अध्यक्ष बसवला आहे, त्याविरोधात या दोन्ही पक्षांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या सदस्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, सुनावणी होत नसल्याने आता तक्रारदारांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून आयुक्तांना कालमर्यादा घालून देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात येणार आहे.

तक्रारदारांचे वकील ॲड. दत्तात्रय घोडके यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले यांची झालेली निवड नियमाला धरून नसल्याने याबाबत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. पहिल्या टप्प्यात सुनावणी झाली. त्यानंतर सुनावणी वेळेत होत नसून चालढकल केली जात आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून विभागीय आयुक्तांना सुनावणीसाठी कालमर्यादा घालण्याची मागणी करणार आहे.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे संख्याबळ असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी नियम डावलून चुकीच्या प्रकारांना मदत केल्याचा आरोप ॲड. घोडके यांनी केला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया झाली होती, त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी हा प्रकार साताऱ्यात घडला आहे.

Satara ZP
Shivsena Hearing : ठाकरेंसाठी कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात जोरदार बॅटिंग; पण नार्वेकर म्हणतात,‘माझाच निर्णय कायम राहणार...’

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले यांची झालेली निवड ही नियमाला धरून नसल्याने याबाबत विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. वास्तविक एक महिन्याच्या आत पुढील तारीख देणे अपेक्षित असताना तसे होत नाही. सुनावणीची अंतिम नोटीस देण्यात येत नाही, त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे ॲड शिंदे यांनी सांगितले.

Satara ZP
Mohite Patil : जयकुमार गोरेंच्या गडात मोहिते पाटलांच्या गाठीभेटी; माढ्यातील संघर्ष आणखी धारदार होण्याची चिन्हे!

अडीच वर्षांसाठी निवड : लवकर निर्णय घ्या

या याचिकेद्वारे विभागीय आयुक्तांना सुनावणीसाठी वेळ ठरवून देण्याची मागणी करणार आहे. झेडपी अध्यक्षांची निवड ही अडीच वर्षांसाठी आहे, त्यामुळे सुनावण्यांमध्ये हा कार्यकाळ जाऊ नये, यासाठी आमचा लढा सुरू आहे. आमच्या पक्षकाराला न्याय मिळावा, हा आमचा हेतू असल्याचे ॲड. घोडके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com