
Kolhapur News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रम केले जातायत. पण याच्यात भाजपने बाजी मारली असून सदस्य नोंदणीतून कार्यकर्त्यांसह नेत्यांना सर्वसामान्यांमध्ये उतरवले आहे. भाजपने कमी कालावधीत 1 कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा पार केला असून आता शिंदेंची शिवसेना देखील भाजपच्या रणनीतीचा पक्ष वाढीसाठी वापर करून घेताना दिसत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदस्य नोंदणी करण्याचे आदेश दिले असून त्याची जबाबदारी खासदारांसह खास नेत्यांकडे देण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन आणि बांधणी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याने लोकांच्यातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आता सदस्य नोंदणी हातात घेण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी शिंदे सेनेनं जोरदार तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सदस्य नोंदणीला सुरूवात करण्यात येणार आहे. याची जबाबदारी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे देण्यात आली आहे. शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात येथे सांगलीत झाली. यावेळी खासदार माने यांनी याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी आमदार सुहास बाबर, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, गौरव नायकवडी, अमोल पाटील उपस्थित होते.
यावेळी खा. माने म्हणाले, शिवसेनेने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तीस हजार शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करण्याचे टार्गेट घेतले आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 30 हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन आणि बांधणी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याने लोकांच्यातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.
सांगली, कोल्हापूरसह सातारा या तीन जिल्ह्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याकडे दिली आहे. तालुका, गाव पातळीवर बैठक घेऊन ही मोहीम राबिवण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. महायुतीत तीन पक्षाचा फॉर्मुला समित्या निवडीबाबत तयार होईल. त्यानुसार त्याची अंमलबजावणी होईल. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही, याबाबतची काळजी घेण्यात येईल, असेही खासदार माने यांनी सांगितले.
यावेळी खा. माने यांनी, नशेखोरी रोखण्यासाठी केवळ जिल्ह्याचा टास्क फोर्स तयार करून उपयोग होणार नाही, अशी भूमिका घेताना कर्नाटक-महाराष्ट्र सरकारने एकत्रित येऊन टास्क फोर्स करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामार्फत प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला सातत्याने महापुराचा सामना करावा लागला. मात्र वडनेरे समितीकडून चुकीची अहवाल देवून दिशाभूल केली आहे. अलमट्टीची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने परस्पर घेतला आहे. अलमट्टीच्या वस्तुस्थितीबाबत राज्य सरकारने स्वेतपत्रिका काढू सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची गरज असल्याचे खासदार धैर्यशिल माने यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.