आम्हाला शिंदे गट-तमूक गट म्हणू नका; शिवसेना आमचीच : तानाजी सावंतांनी पुन्हा सुनावले

ज्यांनी हिंदुतत्वाचे व्रत, विचार तुम्हा आम्हाला दिशा दिली. मार्गदर्शन केले. तो विचार कुणी तरी सोडला होता. तो विचार घेऊन आज आम्ही तुम्हा समोर येतोय.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : आम्हाला शिंदे गट, अमूक तट म्हणू नका. ही शिवसेना (shivsena) आमचीच म्हणजे एकनाथभाऊ शिंदे (Eknath shinde) यांची शिवसेना आहे. आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना आहे, अशा शब्दांत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेना पक्षावर पुन्हा एकदा शिंदे गटाचा दावा सांगितला. (Shiv Sena is ours, that is Eknath Shinde's : Tanaji Sawant)

Tanaji Sawant
‘हाफकिन’वरून प्रश्न विचारताच आरोग्यमंत्री भडकले; ‘मी तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटतो का?’

आरोग्य मंत्री झाल्यानंतर सोलापूर शहरात प्रथमच आलेल्या सावंत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी भैया चौक, बुबने चाळ येथे शिवसेना शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रियदर्शन साठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्या कार्यक्रमात सावंत यांनी आम्हाला शिंदे गट म्हणू नका, असे पत्रकारांना सुनावले.

Tanaji Sawant
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार?; या कारणामुळे शोधला पर्याय

आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले शिंदे गट, अमुक तट म्हणू नका. ही शिवसेना आमचीच म्हणजे एकनाथ भाऊंची शिवसेना आहे. आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे. ज्यांनी हिंदुतत्वाचे व्रत, विचार तुम्हा आम्हाला दिशा दिली. मार्गदर्शन केले. तो विचार कुणी तरी सोडला होता. तो विचार घेऊन आज आम्ही तुम्हा समोर येतोय. भविष्यातदेखील तीच विचारधारा घेऊन आम्ही जनतेची सेवा करू असेही तानाजी सावंत यांनी सांगितलं.

Tanaji Sawant
राष्ट्रवादीचा बारामतीचा गड २०२४ मध्ये उद्‌ध्वस्त होईल आणि भाजप नक्की जिंकेल!

एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला आणि आम्ही ४० आमदारांनी जो उठाव केला, त्याला ३० वर्षांचे सहकारी असलेल्या भाजपने चांगली साथ दिली. न भूतो अन्‌ भविष्यती यश महाराष्ट्राने पाहिले आहे. गेली दोन-अडीच वर्षे या सरकारने महाराष्ट्राची कुचंबणा लावली होती. ती संपविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पाच वर्षे मागे गेलेला महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी मागचा अनुशेष भरून काढून २०२४ मध्ये त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यायची आहे, त्यासाठी जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना आणि सहयोगी पक्षाच्या एकजुटीचे दर्शन हा महाराष्ट्र बघेल, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com