Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांविरोधात शिवसेना, संभाजी ब्रिगेड आक्रमक; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Controversial statement : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकर यांच्या विरोधात सोलापूर आणि पुण्यात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Rahul Solapurkar
Rahul SolapurkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 February : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूकर यांचा आणखी एक वाद्‌ग्रस्त विधानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सोलापूरकर यांनी विधान केले आहे. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकर यांच्या विरोधात सोलापूर आणि पुण्यात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) वतीने पर्वती पोलिस ठाण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

पर्वती पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत ‘राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा,’ अशी मागणीही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. आता पर्वती पोलिस कोणती भूमिका घेतात, याकडे पुणेकर आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे.

Rahul Solapurkar
Ramraje Naik Nimbalkar : रामराजेंनी अखेर तलवार उपसलीच, ‘शेवट मी करणारच’ चा इशारा कोणाला?, फलटणमध्ये संघर्ष वाढणार...

दरम्यान, सोलापूरमध्ये (Solapur) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही राहूल सोलापूरकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या वतीने सोलापूरकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यात सोलापूरकर यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून राज्यातील जातीजातींमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त बोलून अराजकता निर्माण करणाऱ्या सोलापूकरवर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणीही सोलापूर शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

Rahul Solapurkar
Sanjeevraje : ‘माझ्याकडं अन्‌ मुलाकडं रोख 2 लाख 35 हजार, दागिने सापडले; तेही त्यांनी परत केले’ : संजीवराजेंनी सांगितली 5 दिवसांची इनसाईड स्टोरी

राहुल सोलापूरकर याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरवून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. राहूल सोलापूरकर नावाचा माणूस अभद्र माणूस, देशद्रोही जाती-जाती आणि धर्मा-धर्मांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या औलादींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीने अटक करावी, अशी मागणी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण आणि शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com