Malojiraje Birthday Poster
Malojiraje's Birthday PosterSarkarnama

Kolhapur Politics : शिवसेनेचा डोळा आता काँग्रेस खासदार शाहू महाराजांच्या घरावर? भविष्यातील संकेत पोस्टरवर झळकले

Malojiraje's Birthday Poster Politics : उद्या मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने कोल्हापुरातील दसरा चौक येथे लावलेला फलक चांगलाच चर्चेत आला आहे. केवळ चर्चेत नव्हे तर भविष्यातील राजकीय संकेत या फलकाच्या माध्यमातून देण्यात आलेत का? असी चर्चा देखील सध्या कोल्हापुरात रंगली आहे.
Published on

Kolhapur News, 02 Jul : वाऱ्याची दिशा जशी बदलते तशी कोल्हापुरातील राजकारणाची दिशा दिवसेंदिवस बदलत आहे. काँग्रेससोबत असणारा नेता उद्या भाजपमध्ये तर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असलेला नेता शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत.

अशातच कोल्हापुरात एका पोस्टरवरून राजकीय खळबळ उडाली आहे. कारण काँग्रेसचे नेते आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र माजी आमदार मालोजीराजे यांचा पोस्टर नुकताच शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेले शारंगधर देशमुख यांच्यासोबत झळकला आहे.

उद्या मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने कोल्हापुरातील दसरा चौक येथे लावलेला फलक चांगलाच चर्चेत आला आहे. केवळ चर्चेत नव्हे तर भविष्यातील राजकीय संकेत या फलकाच्या माध्यमातून देण्यात आलेत का? असी चर्चा देखील सध्या कोल्हापुरात रंगली आहे.

Malojiraje Birthday Poster
Shaktipith Highway : कोल्हापुरातील आमदाराची आश्चर्यकारक मागणी; शक्तिपीठ महामार्गासाठी सुचवले 4 पर्याय

कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत उत्तर विधानसभा मतदारसंघातून शारंगधर देशमुख हे काँग्रेसमधून इच्छुक होते. त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. राष्ट्रवादीचे राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर देशमुख नाराज झाले. काँग्रेसमध्ये बंड झाल्याने मधुरिमाराजे छत्रपती त्यांना ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. मधुरिमाराजे छत्रपती या माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी आहेत.

मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला. शहरातील एका गटांमध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याबाबत नाराज आहे. तर नाराज झालेल्या शारंगधर देशमुख यांनी नुकताच शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेतील तब्बल आजी-माझी असे पस्तीस नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचा दावा राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षांसह शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. पहिल्या टप्प्यातील अनेक नगरसेवकांचा पक्षप्रवेश झालेला आहे.

Malojiraje Birthday Poster
Maharashtra politics : आदित्य अन् अमित ठाकरेंची शाळा काढणाऱ्या CM फडणवीसांना संदीप देशपांडेंनी सुनावलं...

तर दुसऱ्या टप्प्यातील शहरातील उत्तर भागातील नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सहाजिकच कोल्हापूर शहरातील दसरा चौकात लावलेला हा पोस्टर चर्चेचा विषय ठरला आहे.

गुरुवारी माजी आमदार मालोजीराजे यांचा वाढदिवस असल्याने शहरात ठिकठिकाणी शुभेच्छांचे पोस्टर लागले आहेत. दसरा चौकातील शारंगधर देशमुख यांच्यासोबत असलेला फोटो, फोटोच्या मागे असलेली भगव्या बॅकग्राऊंडमुळे भविष्यातील संकेत दसरा चौकातून दिले आहेत का? अशी चर्चा देखील कोल्हापुरात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com