Kolhapur News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बळकटीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकारिणीचा विस्तार केला. त्यामध्ये नेतेपदी, उपनेतेपद आणि संघटक पदावर नव्या नियुक्त्या देण्यात आल्या.
कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनाही उपनेतेपदाची संधी देण्यात आली आहे. संजय पवार हे मातोश्रीचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. मागील राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून संजय पवार यांना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती.
मुंबईत 'मातोश्री' येथे ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी नव्या नियुक्तांची घोषणा करण्यात आली. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर यांना शिवसेनेच्या नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली.
उपनेतेपदावर विजय साळवी (कल्याण), संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), शीतल देवरुखकर (मुंबई), शरद कोळी (सोलापूर), संजय जाधव (परभणी) यांची निवड करण्यात आली. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परिणाम घडला होता. अनेक जिल्ह्यांत ठाकरे गटाला धक्का बसला होता. त्यामुळे ठाकरे गटाची पुनर्बांधणी करण्यासाठी ठाकरे गटाने विश्वासू सहकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
शिवसैनिक संजय पवार हे ठाकरे गटाचे अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. निष्ठावंत राहण्याचा फायदा त्यांना वेळोवेळी मिळालेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी मिळाली होती.
संजय पवारांसमोर मोठं आव्हान
ठाकरे गटाचे उपनेतेपद मिळाल्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार यांची जबाबदारी वाढली आहे. ठाकरे गटातील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. विजय देवणे यांच्याबद्दल ग्रामीण भागात नाराजी आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे गट केवळ नावापुरता शिल्लक आहे की काय? अशी परिस्थिती होती. पण संजय पवार यांना ठाकरे गटात नवा हुंकार फुंकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. उपनेतेपद देत एक प्रकारे 'मातोश्री'नेही मोठी जबाबदारी संजय पवार यांच्यावर सोपवली आहे.
Edited by : Sachin Fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.