Uday Samant Warning : ‘निष्क्रीय नेत्यांना घरी पाठवणार : गळ्यात हार अडकवून नेतेगिरी आता शिवसेनेत चालणार नाही’

Solapur Shivsena News : शिवसेनेतील निष्क्रीय पदाधिकाऱ्यांवर कारवाईसाठी एकनाथ शिंदे यांनी हालचाली सुरू केल्याची माहिती उदय सामंत यांनी सोलापुरात दिली आहे.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 May (प्रभूलिंग वारशेट्टी) : दिखाऊ आणि सोयीचे राजकारण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गच्छंती करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चक्रे फिरवली आहेत. येत्या ५ जून रोजी खासदार धैर्यशील माने सोलापुरातील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कामाचा ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ तपासणार आहेत. पक्षात केवळ काम करणाऱ्यालाच पद आणि सन्मान मिळेल. पण निष्क्रीय नेत्यांना घरी पाठवण्यासाठी यंत्रणा उपमुख्यमंत्र्यांनी कामाला लावली आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आयोजित शिवसेनेच्या आढावा मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर आणि दिखाऊ राजकारणावर कठोर शब्दांत आसूड ओढले.

ते म्हणाले, गळ्यात मोठे हार अडकवून नेतेगिरी करणे आता शिवसेनेत चालणार नाही. प्रत्यक्ष बूथवर जाऊन घाम गाळणारा आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणारा सामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा हुकमी एक्का असेल, अशा आक्रमक शब्दांत सामंत यांनी शिवसैनिकांची कानउघाडणी केली.

मेळाव्यात शंभर टक्के बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नोंदणीबद्दल त्यांनी कौतुक केले. मात्र, बैठकीतील रोडावलेल्या उपस्थितीवर तीव्र संताप व्यक्त करत, ‘कागदावर काम चोख झाले. पण, मैदानात ताकद दाखवायची वेळ आली तेव्हा संख्या का रोडावली’ अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी संघटनात्मक ढिलाईचे वाभाडे काढले.

Uday Samant
Sonu Sood : मला तीन पक्षांकडून राज्यसभेची ऑफर होती : सिनेअभिनेता सोनू सूदचा गौप्यस्फोट

मनभेद ठेवू नका

मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक नेत्यांच्या सुंदोपसुंदीवर बोट ठेवत कडक शब्दांत समज दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन मतदारसंघांत तीन हजारांची गर्दी उसळते, मग सोलापूरच्या चार मतदारसंघांत ही संख्या का रोडावली? आपण केवळ प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतोय की जनाधार गमावतोय, याचे तातडीने आत्मचिंतन करा. शिवसेना म्हणजे समोरच्याला वाजतगाजत रोखणारा आक्रमक इतिहास आहे. तो इतिहास जिवंत ठेवण्यासाठी संघटना कागदावर नव्हे; तर रस्त्यावर दिसली पाहिजे.

सिद्धाराम म्हेत्रेंच्या पाठीवर कौतुकाची थाप

चारही मतदारसंघांत सर्वाधिक आणि प्रामाणिक काम सिद्धाराम म्हेत्रे यांनी केल्याचे सामंत यांनी जाहीरपणे सांगितले. मात्र, अंतर्गत गटबाजी आणि उभी विभागणी यामुळे म्हेत्रेंच्या कामाची ताकद निष्प्रभ ठरत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. या बैठकीला खासदार धैर्यशील माने, राहुल शेवाळे, खासदार प्रा. ज्योती वाघमारे आणि सिद्धाराम म्हेत्रे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

Uday Samant
Mahayuti Dispute : ‘पालकमंत्री कोणाचाही असला तरी महायुतीत मिठाचा खडा कोणी टाकू नये’

बूथप्रमुख हाच पक्षाचा कणा

राज्यभरात सध्या दीड लाख बूथप्रमुख तयार करण्याचे काम युद्धपातळीवर उपमुख्यमंत्र्यांनी वेगळ्या यंत्रणेद्वारे सुरू केले आहे. बुथप्रमुख हीच शिवसेनेची खरी ताकद असेल. आम्ही मुंबई-मंत्रालय, आमचा मतदारसंघ सोडून तुमच्याकडे येतो, तेव्हा संघटनात्मक आक्रमकतेची किमान अपेक्षा असते, अशा शब्दांत त्यांनी नेत्यांना सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com