Sonu Sood : मला तीन पक्षांकडून राज्यसभेची ऑफर होती : सिनेअभिनेता सोनू सूदचा गौप्यस्फोट

Sonu Sood Foundation News : अभिनेता सोनू सूद यांनी सोलापुरात बोलताना तीन पक्षांकडून राज्यसभेची ऑफर आल्याचा गौप्यस्फोट करत राजकारणासाठी मानसिक तयारी नसल्याचे सांगितले.
Sonu Sood
Sonu SoodSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 May : मला तीन राजकीय पक्षांकडून राज्यसभेची ऑफर आली होती, पण मानसिकदृष्टया राजकारणात जाण्याची माझी तयारी नव्हती, असा गौप्यस्फोटही अभिनेता सोनू सूद यांनी आज सोलापूरमध्ये केला.

सोनू सूद फाउंडेशनच्या वतीने सोलापूर (Solapur) जिल्ह्यात उन्नती प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या प्रकल्पांतर्गत मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी गाव विकासासाठी दत्तक घेतले आहे, त्याबाबत माहिती देण्यासाठी सोनू सूद हे सोलापुरात आले होते, त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय ऑफरबाबत माहिती दिली.

सोनू सूद (Sonu Sood) म्हणाले, मला अनेक राजकीय पक्षांकडून विविध पदांच्या ऑफर आल्या आहेत. त्यात राज्यसभेचे तिकिट देण्याचीही ऑफर होती. पण, राजकारणात प्रवेश करण्यासाठी मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो. मी राजकारणात गेलो, तर सामाजिक कामाच्या उद्दिष्टापासून भटकलो गेलो असतो, असं मला वाटलं. त्यामुळे मी राजकारणात आलो नाही.

Sonu Sood
Mahayuti Dispute : ‘पालकमंत्री कोणाचाही असला तरी महायुतीत मिठाचा खडा कोणी टाकू नये’

मी सध्या बरोबर करतोय की चुकीचं करतोय, हे मला माहिती नाही. मी अनेकदा त्यात यशस्वी होतो, काही वेळेला अपयशही वाट्याला येते. पण तुम्ही जेव्हा एखाद्या पक्षासोबत जोडले जाता, तेव्हा तुम्हाला तुमच्या कामाचे स्वातंत्र राहत नाही, त्यामुळे मी राजकारणात जायला तयार नव्हतो, असेही सोनू सूद यांनी स्पष्ट केले.

आताही राजकारणात जाण्याचा मी कोणताही विचार केलेला नाही. पण, जनतेसोबत कायम राहणार आहे. मला अनेक चित्रपट करायचे असून त्याद्वारे जनतेची करमणूक करायची आहे. जनतेला अनेक डायलॉग मला ऐकावयाचे आहेत. वेळ आल्यानंतर राजकारण येईल, असे सोनू सूद यांनी सांगितले.

Sonu Sood
Vidhan Parishad Election : नाराज प्रफुल पटेलांचा खंदा समर्थक राष्ट्रवादीला देणार धक्का; विधान परिषदेसाठी कमळ हाती घेणार

अभिनेता विजय यांच्याप्रमाणे पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक लढविणार का? या प्रश्नावर ‘तुम्ही मला महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं वाटतंय.’ मी महाराष्ट्रात येतो, तर तुम्ही मला पंजाबमध्ये घेऊन जाता,’ असे उत्तर देताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com