Karmala Politic's : ‘आज याला बघूनच घेतो’; शिवसेनेच्या दिग्विजय बागलांची जिल्हाप्रमुख महेश चिवटेंना दमबाजी, पोलिसांत तक्रार

Digvijay Bagal threatens shivsena District chief करमाळा तालुक्यातील सूळवस्ती येथे दिग्विजय बागल यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांना धमकी दिल्याचा प्रकार घडला. चिवटे यांनी करमाळा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली आहे.
Digvijay Bagal-Mahesh Chivate
Digvijay Bagal-Mahesh ChivateSarkarnama
Published on
Updated on

माजी आमदार जयवंतराव जगताप यांना शिवसेनेत घेतल्याचा राग मनात धरून दिग्विजय बागल यांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांना करमाळा तालुक्यात उघडपणे दमबाजी व धमकी दिली.

भाजपचे रामा ढाणे यांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाद चिघळण्यापासून रोखला गेला; पोलिसांनी चिवटे यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दिग्विजय बागल यांच्यावर यापूर्वीही कार्यकर्त्यांना मारहाणीचे गुन्हे दाखल असून, सातत्याने वाद निर्माण केल्याचे आरोप आहेत.

Karmala, 20 September : ‘माजी आमदार जयवंतराव जगताप आणि नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांना शिवसेनेत का घेतले?’ याचा राग मनात धरून मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांना दमबाजी करत धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. करमाळा तालुक्यातील सूळवस्ती येथे ही घटना घडली असून चिवटे यांनी करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिस तक्रारीत महेश चिवटे (Mahesh Chivate) यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री जयकुमार गोरे हे पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी करमाळा तालुक्यातील खडकी येथे आले होते. त्या वेळी मित्रपक्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चिवटे तया ठिकाणी गेले होते. त्यावेळी समोरून आलेले दिग्विजय बागल यांनी माझ्यापासून फूटभर अंतरावर थांबले आणि स्वतःच्या हातातील घड्याळ काढून एका समर्थक कार्यकर्त्याकडे देऊन आज याच्याकडे बघूनच घेतो, म्हणत दमबाजी केली.

या वेळी भाजपचे रामा ढाणे हे महेश चिवटे यांच्या बाजूला उभा राहिले, त्यामुळे वादाचा मोठा प्रसंग टळला गेला. ढाणे हे समोर येताच दिग्विजय बागल (Digvijay Bagal) मागे सरकले. मिशीवर ताव देणे, कॉलर ओढणे, हात जोडणे अशा कृती करून तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे दमबाजीचा प्रकार सुरू होता, असे चिवटे यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

करमाळा तालुक्यातील खडकी येथील सूळवस्तीवर दमबाजी करून धमकी दिल्याची तक्रार जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आज (ता. २० सप्टेंबर) पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून त्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मस्के यांच्याकडे सोपवला आहे.

Digvijay Bagal-Mahesh Chivate
Solapur ZP : प्रतापसिंह मोहिते पाटलांनी मराठा-ओबीसी केमिस्ट्री जुळवली अन्‌ जिल्हा बॅंकेचे शिपाई नारायण खंडागळे ZP अध्यक्ष बनले

माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिग्विजय बागल आणि जिल्हाप्रमुख चिवटे या दोघांमध्ये सातत्याने वाद होत आहेत. चिवटे आणि बागल यांच्यातील वादाचा प्रकार तालुक्यातील उपस्थित शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहिला.

म्हणून मी संयमाने वागत आहे : महेश चिवटे

याबाबत चिवटे म्हणाले की, पक्षसंघटना वाढवण्यासाठी चांगली लोकं पक्षात येत असतील तर त्यांना घेण्याच्या सूचना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत, त्यानुसार माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि जिल्ह्यातील इतर मान्यवरांच्या समन्वयाने माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.

आगामी सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवणार असल्याची घोषणा जगताप यांनी केली आहे, त्याचा राग मनात धरून सातत्याने दिग्विजय बागल वाद घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मी ही सर्व गोष्ट संयमाने घेत आहे, त्यामुळेच मी त्या दिवशीचा प्रकार सहन करून आज पोलिसांत तक्रार दिली आहे

Digvijay Bagal-Mahesh Chivate
Barshi Crime : बार्शीतील कला केंद्रात पुन्हा क्राईम; ‘आईकडून 20 लाख मागून घे; नाहीतर हातपाय तोडेन’, खंडणीसाठी मॅनेजरचे अपहरण

दिग्विजय बागल यांनी दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांना मारहाण केली होती. त्याबाबत पोलिसांतही गुन्हा दाखल झाला होता. तसेच, शशिकांत केकान, गणेश युरे अशा कार्यकर्त्यांना मारहाण करून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे दिग्विजय बागल कोणालाही दमबाजी करण्याचा प्रयत्न करतो, पण, अशी दमबाजी मी खपवून घेणार नाही. वेळप्रसंगी जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे.

  1. प्र: महेश चिवटे यांना धमकी कोणी दिली?
    उ: माजी कारखाना अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी.

  2. प्र: वादाची मुख्य कारणं काय होती?
    उ: माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश.

  3. प्र: हा प्रकार कोठे घडला?
    उ: करमाळा तालुक्यातील खडकी येथील सूळवस्ती येथे.

  4. प्र: पोलिस तपास कोणाकडे सोपवला आहे?
    उ: सहायक पोलिस निरीक्षक मस्के यांच्याकडे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com