Shivaji University : शिवाजी विद्यापीठ हादरले! PHD अंतर्गत मूल्यमापन परीक्षा चक्क व्हॉट्सअ‍ॅपवर, विभागप्रमुखाचा धक्कादायक कारनामा

Shivaji University PhD Exam Controversy : विद्यापीठात पीएचडी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरपीई हा अभ्यासक्रम करणे बंधनकारक आहे. मात्र, यासाठी तयार केलेला अभ्यासक्रम डाउनलोड करून संशोधक विद्यार्थ्यांना देऊ नये, असा विद्यापीठ प्रशासनाचा नियम आहे. यासंदर्भात विद्यापीठाचे परिपत्रकही आहे.
Shivaji University PhD examination controversy after allegations of conducting the RPE course assessment through WhatsApp.
Shivaji University PhD examination controversy after allegations of conducting the RPE course assessment through WhatsApp.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 28 Oct : राज्यात एमपीएससी आणि नीटचे पेपर फुटून तरुणांच्या भविष्याची राखरांगोळी होत असताना शिवाजी विद्यापीठात धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे डॉक्टरेट मिळवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांचे भविष्य पुन्हा एकदा अंधारात येण्याची शक्यता आहे. काही मोजक्याच विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठातील एका विभागात पीएचडीसाठीची अंतर्गत गुणांची एक परीक्षा चक्क व्हॉट्सअॅपवर घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संदर्भात एका विद्यार्थ्याने विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे.

विद्यापीठात पीएचडी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरपीई (रिसर्च अँड पब्लिकेशन एथिक्स) हा अभ्यासक्रम करणे बंधनकारक आहे. मात्र, यासाठी तयार केलेला अभ्यासक्रम डाउनलोड करून संशोधक विद्यार्थ्यांना देऊ नये, असा विद्यापीठ प्रशासनाचा नियम आहे. यासंदर्भात विद्यापीठाचे परिपत्रकही आहे.

मात्र, विद्यापीठातील एका अधिविभागाच्या प्रमुख पदावरील व्यक्तीने आरपीई कोर्सचे सर्व मटेरियल डाउनलोड केले. इतकेच नव्हे, तर हे सर्व मटेरियल विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवरून पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. संबंधित विभागप्रमुखांनी विद्यार्थी हे व्हिडिओ पाहतात की नाही, हे तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाइक करावेत, अशी अजब सूचना दिल्याची माहिती आहे. विद्यार्थ्याने व्हिडिओला लाइक केले असेल, तर त्याची कोर्सला नोंदणी ग्राह्य धरण्यात आली. परंतु, हा व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर संबंधित विद्यार्थ्यानेच लाइक केला, याची खातरजमा कशी आणि कुणी केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Shivaji University PhD examination controversy after allegations of conducting the RPE course assessment through WhatsApp.
Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सतेज पाटलांना पुन्हा घेरणार; मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर महायुतीचा प्लॅन ठरला! मुंबईच्या बैठकीत काय ठरलं?

दरम्यान, हा सर्व प्रकार करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून मनाई असताना हे मूल्यमापनही व्हॉट्सअॅपवर प्रश्न पाठवून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रश्न चक्क व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची प्रिंट काढून त्यावर सही करून उत्तरे ई-मेल करावीत, अशी अजब परीक्षा घेण्यात आली. हा प्रकार परीक्षेची गोपनीयता भंग करणारा असल्याने यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या संदर्भात परीक्षा विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.

Shivaji University PhD examination controversy after allegations of conducting the RPE course assessment through WhatsApp.
Pune MLC Election Result : निकालाच्या आधीच भाजप उमेदावाराच्या संस्थेत गुलाल उद्धळला, कौस्तुभ गावडे विजयी? कोल्हापुरात जल्लोष

ही संपूर्ण प्रक्रिया नियमात बसणारी नसल्याने ती रद्द करावी, शिवाय गोपनीयतेचा भंग झाला आहे, असा आक्षेप घेण्यात आला आहे. पीएचडी आरपीई परीक्षा हा गोपनीय विषय आहे. विद्यार्थ्यांना विभागात बोलावून त्यांची परीक्षा घेणे आवश्यक असताना त्यांची परीक्षा व्हॉट्सअॅपवर घेण्याचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे परीक्षा संबंधित विद्यार्थ्यानेच दिली का, हे कसे ठरवणार? विद्यार्थ्यांकडून उत्तरे ई-मेलवर मागवली आहेत, ती उत्तरे विद्यार्थ्यांनीच लिहिली आहेत, हे कसे कळणार? परीक्षेसाठी विद्यार्थी उपस्थित असणे आवश्यक आहे.

दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांकडून आवश्यक ते लेखी पुरावे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याची खातरजमा करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती परीक्षा विभाग प्रमुख अजितसिंह जाधव यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com