Shivsena UBT News : शिवबंधन बांधलं, ए बी फॉर्मही दिला अन् ठाकरेंनी के. पी. पाटलांना दिला आदेश; म्हणाले...

K.P Patil Join Shivsena UBT : मातोश्रीवर जाऊन बुधवारी त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लागा तयारीला असे सांगताच के. पी. पाटील यांनी तयारी सुरू केली आहे.
Uddhav Thackeray, K. P. Patil
Uddhav Thackeray, K. P. Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या महिनाभर पासून सुरू असलेल्या चर्चांना माजी आमदार के. पी. पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून पूर्णविराम दिला. राधानगरी भुदरगड-गारगोटी-विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार के. पी. पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली.

मातोश्रीवर जाऊन बुधवारी त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लागा तयारीला असे सांगताच के. पी. पाटील (K. P. Patil ) यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, निवडणुकीसाठी आणि उमेदवारीसाठी पाटील यांनी महिनाभरात तीन पक्ष बदलण्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. (Shivsena Ubt News)

उमेदवारीसाठी माजी आमदार के. पी. पाटील हे गेले दोन ते तीन दिवस मुंबईत तळ ठोकून होते. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेऊन त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. तर ए. वाय. पाटील यांनी देखील ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राधानगरीतून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत के. पी. पाटील यांनी शिवबंधन बांधले. त्याशिवाय त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म दिला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून के. पी. पाटील असा सामना रंगणार आहे.

Uddhav Thackeray, K. P. Patil
Sunil Tingre: धाकधूक वाढली! वडगाव शेरी भाजपाच्या वाट्याला? सुनील टिंगरेंनी घेतली दादांची भेट

दरम्यान, ए. वाय. पाटील हे नेमकी भूमिका काय घेणार? शिवाय निष्ठावंत शिवसैनिक कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात सत्ता बदल होत असताना के. पी. पाटील यांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली होती. मात्र बिद्री कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचा प्रचार केला होता.

राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य पाहून त्यांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा पर्याय निवडला होता. त्यानंतर आपण महायुतीत कधीच गेलो नाही, असा खुलासा देत त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांच्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Uddhav Thackeray, K. P. Patil
MVA Vs CPI : भालचंद्र कांगो यांनी 'MVA'ला ठणकावले; सन्मान मिळणार आहे का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com