BJP MLC News : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या नेत्याची विधानपरिषदेची संधी हुकणार का ?

Legislative Council Opportunity news : विधान परिषदेतील भाजपचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा येणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात चार महिन्यातच पुन्हा एकदा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त पाच जागांसाठी २७ मार्चला मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहे. विधान परिषदेतील भाजपचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा येणार आहे.

महायुतीच्या (Mahayuti) वाट्याला आलेल्या या पाच जागेसाठी तीन पक्षात सध्या जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. त्यातच आता विदर्भातील भाजपच्या रिक्त जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या नेत्याची वर्णी लागणार का ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Devendra Fadnavis
Ajit Pawar : अजितदादांनी टाकला मोठा डाव; पक्षांतर्गत वाद वाढू नयेत धनंजय मुंडेंच्या रिक्त मंत्रिपदाबाबत घेतला 'हा' निर्णय!

विधानपरिषदेतील भाजपचे (Bjp) प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागेवर वर्णी लागावी यासाठी तीन पक्षामध्ये चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडील एकाच जागेसाठी जवळपास 100 जण इच्छुक असल्याचे समजते.

Devendra Fadnavis
Ajit Pawar : मंत्री नितेश राणेंना अजित पवारांनी फटकारलं, म्हणाले की, ‘या देशातला मुस्लिम...’

दुसरीकडे आता भाजपच्या वाट्याला आलेल्या तीन जागासाठी अनेकजण इच्छुक आहेत. विदर्भातील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण दटके विजयी झाले आहेत. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर विदर्भातील एका नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या जागेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि मानद सचिव संदीप जोशी यांना संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. परंतु, भाजप श्रेष्ठींकडून माधव भंडारी, दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर या तिघांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Devendra Fadnavis
Eknath Shinde News : कांद्याच्या मुद्यावरून भुजबळ आक्रमक, 'आपण अमित शाहांकडे जाऊ', शिंदेंनी दिलं आश्वासन

विदर्भातील एका जागेसाठी दादाराव केचे यांना संधी देण्यात आली तर तूर्तास जोशी यांची आमदार होण्याची शक्यता कमी आहे. सध्या विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचेच उमेदवार सहज विजयी होतील, असा अंदाज आहे. त्यामुळेच महायुतीकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे आता येत्या काळात या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Devendra Fadnavis
Karad : अतुल भोसलेंचा 'हेलिकॉप्टर शॉट'; अजितदादांच्या जोडीनं 'सेफ गेम' खेळणाऱ्या उंडाळकरांचं टेन्शन वाढवलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com